Saturday, October 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूज‘माझ्या घरावरही हल्ला होऊ शकतो’; ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगेंनी व्यक्त...

‘माझ्या घरावरही हल्ला होऊ शकतो’; ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगेंनी व्यक्त केली भीती

जालना | Jalana
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर जरांगे पाटील यांनी आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आपल्याविरोधात मोठे नेटवर्क काम करत असून, आपल्यावर किंवा आपल्या घरावर हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या वक्तव्यामुळे कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला आता सुरक्षेचा मुद्दाही जोडला गेला आहे.

जरांगे पाटील यांनी आपल्याला बदनाम करण्याचा आणि मराठा आरक्षण आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. आपण गरिबांच्या आणि मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी भूमिका घेत असल्यामुळे काही लोक आपल्या विरोधात कट रचत असल्याचा त्यांचा दावा आहे.

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप करत काही सवाल केले. ‘५०० कोटी देण्याचा आणि बदनाम करण्याचा घाट का घातला? मराठ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न का केला? पक्षाचा फंड माझ्याविरोधात वापरला गेला. तोंडावर गोड बोलायचे आणि मागून षडयंत्र रचायचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. ऑडिओ क्लिपमुळे सर्व पक्ष खडबडून जागे झाले आहेत. जर श्रीकांत शिंदेंनी पैसे घेतले नसतील तर ते गप्प बसणार नाहीत.’

Nashik Airport New TimeTable: नाशिकच्या ओझर विमानतळावुन विमानसेवेचे २५ ऑक्टोबरपासून नवे वेळापत्रक

मी दिलेली ऑडिओ क्लिप माझ्या अगोदर व्हायरल झालेली आहे, रामदास कदम यांनीच ती क्लिप व्हायरल केली. त्यामुळे, रामदास कदम यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्याजवळच सगळे आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा रामदास कदमांना लक्ष्य केले. मी क्लिप दिल्यावर त्या सोर्सची सगळी हमी आणि जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घ्यावी. या प्रकरणापुरता फडणवीस आणि शिंदे यांच्यावर मला विश्वास आहे, असेही जरांगे पाटील म्हटले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची लोकं माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. माझ्या घरावर हल्ला होऊ शकतो, मला मारून टाकण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचंही त्यांनी म्हटलं. सरकारने माझी स्कॉटिंग काढली, दसरा मेळाव्याला शेवटपर्यंत पोलिसांची स्कॉटिंग दिली नाही.

दरम्यान, ती क्लिप ओरिजनल सर्वांनाच त्याची खात्री आहे, असे म्हणत ती क्लिप एआय जनरेटेड असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही जरांगे पाटलांनी फटकारलं आहे. तसेच, नवनाथ बन यांच्या आरोपावरही जरांगे पाटलांनी पलटवार केला, 100 का कोटी होईना होते का? असा सवाल त्यांनी विचारला.

पीएम मोदींनी लक्ष घालावे नाही तर…
प्रविण दरेकर हे दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या दिल्लीवारीवरून मनोज जरांगे यांनी टीका केली. ते म्हणाले की, ‘आता दिल्लीच्या वाऱ्या सुरू होऊ शकतात. काही दिवसांनी मी काहीच बोलणार नाही ते काय करतात ते फक्त पाहणार आहे. यापुढे सरकारकडून कुणीही न्यायाची अपेक्षा करू नये. या गर्दीच्या माहोलमध्ये मराठ्यांची घुसमट होत आहे. दोन्ही पक्षाकडून माझ्यावर आरोप सुरू आहेत. पण सगळ्याच गोष्टींच्या मुळाशी मी जाणार आहे. फितुरीपासून वाचण्यासाठी नवी फळी तयार केली जात आहे. मला धमकी दिल्यास मी डोक्यात दगड घालेल. पीएम मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालावे नाही तर भाजप १०० टक्के महाराष्ट्रात संपुष्टात येऊ शकतो.’

ताज्या बातम्या

Nashik Crime News :​ लोंढे टोळीचा ‘नाना’ उच्च न्यायालयात; जामिनावर २९...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सातपूर परिसरातील गोळीबार (Satpur Firing Case) खंडणी आणि प्राणघातक हल्ला प्रकरणातील कुख्यात पीएल ग्रुप (लोंढे टोळी) टाेळीचा म्होरक्या प्रकाश उर्फ...