Wednesday, February 4, 2026
Homeनगरआश्वी खुर्द येथे नायलॉन मांजाने तरुण जखमी

आश्वी खुर्द येथे नायलॉन मांजाने तरुण जखमी

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईची नागरिकांतून मागणी

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील आश्वी खुर्द येथील तरुण सकाळी गावातून घरी जात असताना नायलॉन मांजाचा (Nylon Manja) गळ्याला फास लागल्यामुळे जखमी (Injured) झाले. यामुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की संजय बबन कहार (वय 35) हे नित्याचे काम उरकून घरी जात असताना येथील आश्वी खुर्द येथील राजवाडा परिसरामध्ये काही मुले पतंग खेळत होते. अचानक पंतग (Kite) जमिनीवर येत असताना नायलॉन मांजाचा गळ्याला फास लागून ते जखमी झाले.

- Advertisement -

गावामध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. दरम्यान, नशीब बलवत्तर होते म्हणून मोठी दुर्घटना होण्यापासून कहार वाचले. महसूल व पोलीस प्रशासनाने पररिसरामध्ये जर कोणी नायलॉन मांजा विक्री करत असेल तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रवरा कारखान्याचे माजी संचालक अ‍ॅड. अनिल भोसले यांनी केली.

YouTube video player

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...