Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAsia Cup 2025 IND vs BAN : आज भारत- बांगलादेश लढत; कोण...

Asia Cup 2025 IND vs BAN : आज भारत- बांगलादेश लढत; कोण मारणार बाजी?

मुंबई | Mumbai

आशिया चषक क्रिकेट (Asia Cup 2025) स्पर्धेत आज (बुधवारी) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाचा (Team India) सामना बांगलादेशसोबत होणार आहे. बांगलादेश आणि भारतीय संघाने (IND vs BAN) सुपर ४ मध्ये आपल्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ६ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला आहे. रात्री ८ वाजता या दोन्ही संघात सामना होणार आहे.

- Advertisement -

लिटन दासच्या (Litan Das) नेतृत्वाखाली खेळताना बांगलादेशसंघाने अखेरच्या सामन्यात श्रीलंका संघाला ४ गडी राखून विजय संपादन केला आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये १५ सामने खेळविण्यात आले असून, भारताने १३ तर बांगलादेशने २ सामन्यात विजय संपादन केला आहे.

YouTube video player

दरम्यान, बांगलादेश आणि भारत टी २० क्रिकेट सामन्यात १७ वेळा आमनेसामने आले असून, यात भारताने १६ आणि बांगलादेशने १ सामना जिंकला आहे. तर आशिया चषक टी २० क्रिकेट सामन्यात दोन्ही संघांमध्ये २ सामने खेळविण्यात आले असून, दोन्ही सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळविला आहे. बांगलादेशला अद्याप पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...