Sunday, May 19, 2024
Homeनगरआशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेते साबळे साईचरणी लिन

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेते साबळे साईचरणी लिन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

आशियाई क्रीडा स्पर्धेत 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये पहिले सुवर्ण पद जिंकणारे भारतीय खेळाडू अविनाश साबळे यांनी शनिवारी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

- Advertisement -

यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते. 29 वर्षीय अविनाश साबळे यांनी चीनमधील हांगझू येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:19.50 सेकंदात शर्यत पूर्ण करुन राष्ट्रीय विक्रम केला आहे. त्यांनी सन 2018 च्या जकार्ता गेम्समध्ये इराणच्या होसेन केहानीने बनवलेला 8 मिनिटे आणि 22.79 सेकंदांचा मागील आशियाई क्रीडा विक्रम मोडला आहे. ते अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले असून त्यांनी 5 हजार मीटर शर्यतीत रौप्य पदकही मिळविले आहे.

अविनाश साबळे हे महाराष्ट्रातील बीड येथील रहिवाशी असून वयाच्या सहाव्या वर्षापासून धावण्याचा सराव करत आहे. 12 वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतीय लष्कराच्या 5 महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले. अविनाश साबळे यांनी आपल्या वडिलांसह साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी शाल व श्रींची मूर्ती देऊन सत्कार केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या