Friday, October 11, 2024
Homeमुख्य बातम्याAssembly Election 2022 : उत्तर प्रदेशसह ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला;...

Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशसह ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला; ६९० जागांवर होणार निवडणूक

दिल्ली | Delhi

एकीकडे करोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. करोना महासाथीत निवडणुका होणार असल्याने निवडणूक आयोगाकडून निर्बंध लागू केले आहे.

- Advertisement -

६९० जागांवर होणार निवडणूक

एकूण ६९० मतदारसंघात निवडणुका होणार असून गोव्याल्या ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७०, उत्तराखंडमधील ७० आणि उत्तर प्रदेशमधील ४०३ निवडणुकांचा समावेश आहे.

१८.३ कोटी लोक मतदानात सहभाग घेणार

एकूण १८.३ कोटी मतदार या निवडणुकीत सहभागी होणार असून त्यापैकी ८.५५ कोटी महिला मतदार आहेत. सर्व पाच राज्यांमध्ये महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. सर्वाधिक २९ टक्के उत्तर प्रदेशात, गोव्यात २४ टक्के, मणिपूरमध्ये १९ टक्के, उत्तराखंड १८ टक्के तर पंजाबमध्ये १० टक्के महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. २४.९ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत.

पक्षांना उमेदवार निवडण्याचे कारणही द्यावे लागणार

उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयी माहिती मिळायला हवी. उमेदवारांना त्याची माहिती द्यावी लागेल. यासंदर्भात वर्तमानपत्र आणि टीव्ही वाहिन्यांवरून प्रचारादरम्यान तीन वेळा याविषयीची माहिती द्यावी लागेल. याशिवाय राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाईटवर होम पेजवर प्रत्येक उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती द्यावी लागेल. तसेच, याच उमेदवाराला का निवडलं, याचं कारण पक्षाला द्यावं लागेल. उमेदवाराची निवड झाल्यानंतर पुढच्या ४८ तासांत ही माहिती द्यावी लागेल.

किती टप्प्यात होणार मतदान? कधी होणार मतमोजणी?

उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला आणि मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला मतदान होणार आहे. सर्व पाच राज्यांची मत मोजणी १० मार्च रोजी होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या