Friday, November 22, 2024
HomeनगरAssembly Election 2024 : NOTA साठी श्रीगोंदा व श्रीरामपूरमध्ये स्वतंत्र यंत्रे

Assembly Election 2024 : NOTA साठी श्रीगोंदा व श्रीरामपूरमध्ये स्वतंत्र यंत्रे

अहिल्यानगर । प्रतिनिधी

निवडणूक रिंगणात प्रत्येकी १६ उमेदवार असल्याने केवळ NOTA (यापैकी कोणीही नाही) या मतदान पर्यायासाठी स्वतंत्र मतदान यंत्र श्रीगोंदे व श्रीरामपूर मतदारसंघात असणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात संवेदनशील मतदान केंद्र एकही नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत ८५ ते ९० टक्के व त्यापेक्षा जास्त मतदान झालेली दोन केंद्रे शिर्डी व संगमनेर मतदारसंघात प्रत्येकी एक असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिध्दराम सालीठ यांनी दिली.

उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी नगरला आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते. ते म्हणाले, जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सोमवारी (दि. ४) उमेदवार माघारीच्याअखेरच्या दिवशी जिल्ह्याच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यावेळी त्यांनी मतदान प्रक्रियेविषयी माहिती दिली.

नगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघांपैकी श्रीरामपूर व श्रीगोंदा मतदारसंघात प्रत्येकी १६ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, नोटा या मतदान पर्यायासाठी या दोन्ही मतदारसंघात स्वतंत्र मतदान यंत्र लावले जाणार आहे. जिल्ह्यात ३ हजार ७६३ मतदान केंद्र आहेत. मात्र पंधराशे पेक्षा जास्त मतदार संख्या असल्याने नगर तालुक्यातील बुन्हाणनगर (राहुरी मतदारसंघ) व राहाता तालुक्यातील लोणी (शिर्डी मतदारसंघ) येथे प्रत्येकी एक वाढीव मतदान केंद्र असणार आहेत.

जिल्ह्यात ३७ लाख ८३ हजार ९८७ एकूण मतदार असून यात पुरुष मतदार १९ लाख ४६ हजार ९४४ व महिला मतदार १८ लाख १६ हजार ८४१ आहेत. तृतीय पंथी मतदार २०२ आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत ५४ हजार मतदार वाढले आहेत. जिल्ह्यात दिव्यांग मतदार १९ हजार ९६० असून ८५ पेक्षा जास्त वय असलेले ५५ हजार ८०१ मतदार आहेत. या सर्वांना घरी मतदान करण्याची सुविधा पर्याय दिला होता. यापैकी ३५४ दिव्यांग व २ हजार २७१ ज्येष्ठ नागरिक यांनी ही सुविधा स्वीकारली आहे.

तिघे पाहणी करणार

नगर शहरात अनेक रस्त्यांची कामे सुरू असल्याने मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी पर्यायी मार्ग करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी सालीमठ, पोलीस अधीक्षक ओला व मनपा आयुक्त यशवंत डांगे असे तिघेजण संयुक्त पाहणी करून प्रत्येक मतदान केंद्राला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे की नाही याची खातरजमा करणार आहेत तसेच काही रस्त्यांवरील एसटी बसेस वगळता अन्य वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याबाबतही निर्णय त्यानंतर घेतला जाणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या