Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Elections 2024 : २० तारखेलाच का होणार मतदान? निवडणुक आयोगाने...

Maharashtra Assembly Elections 2024 : २० तारखेलाच का होणार मतदान? निवडणुक आयोगाने सांगितलं मोठं कारण…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. २० नोव्हेंबर म्हणजे बुधवारी मतदान होणार आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे.

म्हणून बुधवारी मतदान होणार
राजकीय पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केल्याचे यावरुन दिसून येते. राजकीय पक्षांनी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी लागून मतदान घेऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. सुटी लागून मिळाल्यावर मतदार फिरण्यासाठी किंवा इतर कामांसाठी बाहेर गावी जातात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी परिणाम होतो. राजकीय पक्षांची ही मागणी लक्षात घेऊन बुधावारी मतदान निवडणूक आयोगाने ठेवले आहे.

- Advertisement -

कधी होणार निवडणुक
एकच टप्प्यांत मतदान होणार- २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
२२ ऑक्टोबर रोजी अधिसूचना लागू होईल.
नामांकन दाखल करण्याची मुदत- २९ ऑक्टोबरपर्यंत २०२४ रोजी असेल
दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची पडताळणी करण्याची तारीख- ३० ऑक्टोबर २०२४
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस- ४ नोव्हेंबर २०२४
मतदान कधी असेल- २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान असेल
मतमोजणी निकाल कधी असेल- २३ नोव्हेंबर नोव्हेंबर

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या