Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याआमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे मोठे विधान

आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे मोठे विधान

मुंबई | Mumbai

अकरा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले होते. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह (MLA) भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते…

- Advertisement -

Maharashtra Temperature : राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार

त्यानंतर मार्च महिन्यात या प्रकरणाची पूर्ण सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली असून कोणत्याही क्षणी याप्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा निकाल काय असेल याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून त्यासंदर्भात आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मोठे विधान केले आहे. तसेच आमदारांच्या (MLA) अपात्रतेचा अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचा मुद्दा वारंवार समोर येत आहे. त्यावरही नार्वेकरांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.

IPL 2023 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू आयपीएलमधून बाहेर

नार्वेकर म्हणाले की, १६ आमदारांच्या अपात्रतेचा विषय आहेच, पंरतु आणखी काही आमदारांवरही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सर्वांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यामध्ये काहींनी मुदत वाढवून मागितली आहे. विधानसभेचे जे नियम आहेत त्यानुसार अपात्रतेची कारवाई केली जाईल. तर काही याचिका विधिमंडळ कार्यालयात दाखल असल्याने त्याची प्रक्रिया देखील सुरू होईल. मात्र, न्यायालयाच्या निकालावर सर्व बाबी अवलंबून असतील अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

IPL 2023 : आज MI आणि RCB आमनेसामने; कुणाला मिळणार बाद फेरीचे तिकीट?

पुढे ते म्हणाले की, आपल्या संविधानाची तरतूद आहे, की ज्या वेळेला महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्यालय रिक्त असते, त्यावेळेला त्या कार्यालयाचे अधिकार हे उपाध्यक्षांकडे असतात आणि ज्या ठिकाणी अध्यक्ष कार्यालयात उपस्थित असतात किंवा आपल्या चार्ज घेतात त्यावेळी त्यांच्याकडे अध्यक्षांचे कोणतेही अधिकार राहत नाही. तसेच जेव्हा अध्यक्ष विधानसभेत कार्यरत किंवा उपस्थित असतात त्यावेळेला अशा सगळ्या बाबींसंदर्भातला अधिकार हा केवळ आणि केवळ विधानसभा अध्यक्षांकडे असतो. असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

…तर १६ आमदारांना अपात्रच करेन

दरम्यान, काल विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narahari Zirwal) यांना पत्रकारांनी तुमच्याकडे १६ आमदारांचे प्रकरण आल्यावर काय करणार? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देतांना झिरवाळ म्हणाले होते की, “येऊ दे तर खरी. आल्यावर पाहू. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन”, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या विधानामुळे उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या