Thursday, May 2, 2024
Homeनाशिकआठ महिन्यांत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

आठ महिन्यांत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विविध पथके तयार करून तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीत पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले.

- Advertisement -

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी डिसेंबर 2022 मध्ये नाशिकच्या आयुक्त पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून ते बंद करण्याचे आदेश दिले होते यासोबतच शहरातील अवैध व्यवसायांना लगाम घालता यावा याकरीता अंमली पदार्थ विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक,खंडणी विरोधी पथक, दरोडा व शस्त्र विरोधी पथक आदी पथक तयार करून अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत आहे.

आठ महिन्यात केलेल्या कारवाईमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत 214 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 32 लाख 3हजार809 रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमा अंतर्गत :- 70 गुन्हे दाखल 5 लाख 21 हजार 614रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अंमलीपदार्थ व अवैध पानमसाला कारवाई :- अवैध गुटखा, पानमसाला, सुंगधीत तंबाखु, सिगारेट आदी विक्रीच्या संबंधाने अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून अवैध गुटखा संदर्भात 30 लाख 25 हजार 384 रुपये किमतीचा मुद्देमाल व अंमलीपदार्थ संदर्भाने 12 लाख 43 हजार 822 रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला.अशा प्रकारे अवैध धंद्यावर नजर ठेवून संपूर्णत: अवैध धंदे बंद करण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याकरिता कठोर प्रतिबंधक कारवाई करून आत्तापर्यंत 51 सराईतांना हद्दपार करण्यात आले. संघटीतपणे टोळीने गुन्हे करणार्‍या व नागरीकांना उपद्रव निर्माण करणार्‍यांविरोधात मोक्का कायद्यान्वये 4 गुन्हयांत कारवाई करून 45 संशयितांना जेरबंद केले आहे. एम. पी.डी.ए. कारवाई शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करणार्‍या व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणार्‍या सराईत 7 गुन्हेगारांविरुध्द एम. पी.डी.ए. कायदयान्वये एक वर्षाकरीता स्थानबध्दतेची कारवाई करून त्यांना मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.मालमत्ते विरुध्दच्या गुन्हयात 59 लाख 47 हजार 978 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हे उघडकीस आणले आहेत.

फसवणूक व विश्वासघात प्रकरणांच्या गुन्ह्यातील 18 लाख 40 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हे उघडकीस आणले. नागरिकांना सायबर फ्रॉड व ऑनलाईन फसवणूक या विषयी जागरूक करण्याकरीता सायबर दुत संकल्पना अमलात आणून सायबर व ऑनलाईन फसवणुक रोखण्याकरीता नाविन्यपुर्ण संकल्पना राबविण्यात आली. 300 सायबर दुत तयार करून नागरीकांना सायबर साक्षर केले. वाहतूक शाखा: वाहतूक नियमना संदर्भाने नो पार्किंग ठिकाणी लावण्यात येणारे वाहनांचे टोईंग प्रणाली बंद करून ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी करण्यात आली.

नाशिक शहरातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कर्तव्याचे ठिकाणी उत्साह वाढावा म्हणून पोलीस प्रशिक्षण हॉल येथे नियमीत खाते अंतर्गत प्रशिक्षण चालु करण्यात आले आहेत. पोलीस ठाणे कडील कामकाजात सुधारणा व्हावी म्हणून दरमहा गुन्हे आढावा बैठकी दरम्यान पोलीस ठाणेकडील कामकानाचा मागील व चालु वर्षाचा तुलनात्मक आढावा घेवून दरमहा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने येणारे पोलीस ठाणेस शुभेच्छा देवून गौरविण्यात येत आहे.

सर्व पोलीस ठाणे / शाखा, विभाग यांचा साप्ताहिक आढावा घेवुन बैठकी दरम्यान कामकाजाची नियमीत माहिती घेण्यात येत असुन बैठकी दरम्यान संबंधीतांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सदर कक्षामार्फत नाशिक शहरात भादंविक 363 अन्वये दाखल झालेल्या गुन्हयांतील अपहृत झालेल्या मुला / मुलींचा नियमीत आढावा घेण्यात येत असून शहरातील अपहृत झालेल्या मुलापैकी पोलीस ठाणे व एएचटीयू कक्षामार्फत एकूण 152 मुला / मुलींचा तसेच मिसींगमधील 713 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या