Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Bribe News : प्रभारी सहाय्यक आयुक्त जाळ्यात

Nashik Bribe News : प्रभारी सहाय्यक आयुक्त जाळ्यात

३३ हजारांची लाच भोवली, मालेगावी एसीबीची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाले बांधकामाचे बिल मंजूर करुन देण्यासाठी ठेकेदाराकडून ३३ हजारांची लाच (Bribe) घेणारा मालेगाव महानगरपालिकेचा (Malegaon NMC) सहायक आयुक्त सचिन महाले याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी सायंकाळी सापळा रचून गजाआड केले आहे. दरम्यान, या सहायक आयुक्ताच्या घराची झडती घेतली असता एसीबी पथकाच्या हाती मोठे घबाड लागले असून यात साडेनऊ लाख रुपयांचे सोने व १३ लाख रुपयांच्या रोकडचा समावेश आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन सुरेंद्र महाले (वय ५१, रा. वर्धमाननगर, एलआयसी ऑफिस, मालेगाव कँम्प) असे लाचखोर संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे. तो मालेगाव महानगरपालिकेत वरिष्ठ लिपिक असून सध्या त्याच्याकडे कर विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यातच त्याने महापालिका आयुक्तांचा स्वीय सहायक(पीए) असल्याने तुमचे बिल तत्काळ मंजूर करुन देतो असे सांगत बांधकाम ठेकेदाराकडून एकूण बिलाच्या चार टक्के रक्कम व बक्षिस मागितल्याचे समोर आले आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Crime News : वादग्रस्त पत्रकामुळे नाशकात तणाव; पोलिसांनी केली तात्काळ कारवाई

प्रकरणातील ३४ वर्षीय तक्रारदार हा बांधकाम ठेकेदार असून त्याने मालेगाव महानगरपालिके अंतर्गत गटार बांधकामाचे टेंडर भावाच्या नावे घेतले होते. काम पूर्ण करून नाला बांधकामाचे बिल मंजूर करण्याकरीता त्याने संशयित महाले याची भेट घेतली असता महाले याने ‘महापालिका आयुक्त’ यांचा स्वीय सहायक असल्याचा प्रभाव तक्रारदारावर टाकून बिल लवकर मंजूर करून देतो असे सांगितले. मात्र, बिल मंजूर झाल्यावर स्वतःसाठी व इतरांसाठी बक्षीस म्हणून बिलातील चार टक्के रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले होते.

त्यानुसार बिल मंजूर झाल्यावर तक्रारदार हा महाले याला भेटावयास गेला असता, त्याने(दि.१३) रोजी पंचासमक्ष यांच्यावर ३३ हजार रुपयांची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. यानंतर(दि.२१) सायंकाळी महाले याने लाचेची रक्कम स्विकारताच सापळा रचून असलेल्या एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. याबाबत किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने महाले यास पोलीस कोठडी सुनावली आहे. एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, अपर अधिक्षक माधव रेड्डी, पाेलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या सूचनेने पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार संदीप वणवे, ज्योती शार्दुल, परशुराम जाधव यांनी ही कारवाई केली.

हे देखील वाचा : Nashik News : सिंहस्थ तयारीचा विभागनिहाय आढावा

१३ लाख रोख, १३३ ग्रॅम सोने जप्त

सापळा यशस्वी झाल्यावर एसीबी पथकाने रात्री महाले याच्या वर्धमाननगरातील घराची झडती घेतली. तेव्हा पथकास रोख रक्कम, काही चिजवस्तू आढळून आल्या. यात १३ लाख १० हजार २०० रुपयांची रक्कम, सोन्याचे तीन कॉईन, एकूण १३३ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, आता पथक महालेच्या विविध स्थावर व जंगम मालमत्तांचा शोध घेत असून त्याने ज्ञात स्त्रोतापेक्षा जास्त संपत्ती मिळविली आहे का यासह इतर बाबींचा सखोल तपास सुरु झाला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....