Monday, November 18, 2024
Homeमुख्य बातम्याआतिशी मार्लेना यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; मंत्रिमंडळात कुणाला मिळाली संधी?

आतिशी मार्लेना यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; मंत्रिमंडळात कुणाला मिळाली संधी?

नवी दिल्ली | New Delhi

काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांची मुख्यमंत्रि‍पदी निवड करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. यानंतर आज (दि.२१) रोजी अतिशी मार्लेना यांनी मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेतली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Assembly Election 2024 : निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचितची पहिली यादी जाहीर; ११ उमेदवारांची घोषणा

दिल्लीचे उपराज्यपाल वीके सक्सेना (VK Saxena) यांनी आतिशी यांच्यासहित पाच कॅबिनेट मंत्र्यांना शपथ दिली. त्यामध्ये सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत,इम्रान हुसैन आणि मुकेश अहलावत यांचा समावेश आहे. आतिशी यांच्या मंत्रिमंडळात (Cabinet) मुकेश अहलावत हा एकमेव नवा चेहरा आहे.

हे देखील वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘या’ तारखेला नाशिक दौऱ्यावर

तसेच आतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा दिल्लीचा (Delhi) सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही मोडला आहे. अतिशी ४३ वर्षांच्या आहेत, तर केजरीवाल २०१३ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ४५ वर्षांचे होते.

हे देखील वाचा : Nashik News : परिवहन आयुक्तांसोबत आरटीओ कर्मचारी संघटनेची चर्चा फिस्कटली

दरम्यान,आतिशी यांच्या शपथविधी सोहळ्याला आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) निमंत्रक अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित होते. तर सुषमा स्वराज, शीला दिक्षित यांच्यानंतर अतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या