पुणे |प्रतिनिधी
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या (DRDO) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. Pradip Kurulkar )व्हाईस लेअर टेस्ट (Voice Layer Test) करण्याची परवानगी मागितली आहे. या टेस्टसाठी डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी नकार दिला आहे. असे असले तरी एटीएसने कोर्टाकडे व्हाईस लेअर टेस्ट करण्याची परवानगी मागितली आहे.
कोर्टाने एटीएसला परवानगी दिल्यास त्यांची ही टेस्ट करण्यात येणार आहे. या टेस्ट दरम्यान त्यांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती कोणाला सांगितली आहे की नाही? तसेच सांगितली आहे तर किती माहिती दिली आहे, अशा काही गोष्टी समोर येऊ शकतात.
नाशिकरोड : कैद्याने कारागृह पोलिसाच्या कानशिलात लगावली
दरम्यान, प्रदीप कुरुलकर यांचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची बाब समोर आली आहे. या महिलेसोबतची त्यांची व्हॉटसअप चॅटिंग एटीएसच्या हाती लागली आहे. मात्र या महिलेने अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही. संबंधित महिलेने तक्रार केल्यास कुरुलकर यांच्यावर आणि गुन्हे दाखल होऊ शकतात.
ईडी संचालकांसाठी केंद्र सरकारची सुप्रिम कोर्टात धाव
हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या कुरुलकर यांनी पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याची माहिती समोर आली होती. त्यातून त्यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी हेरासोबत केलेले व्हॉट्सॲप चॅटमध्ये त्यांनी अनेक भारतीय संरक्षण दलाची अनेक संवेदनशील माहिती दिल्याचे समोर आलं आहे. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर झारा दासगुप्तासोबत अनेक अॅपच्या माध्यमातून चॅटिंग केल्याचं समोर आलं आहे. याच प्रकरणी एटीएस तपास करत आहे.