Sunday, May 19, 2024
Homeजळगावचारचाकीतून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

चारचाकीतून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

जळगाव – jalgaon

तालुक्यातील भादली येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना बुधवारी दुपारी घडली. दरम्यान वेळीच प्रकार लक्षात आल्याने कुटुंबियांनी मुलींना अपहरण करणार्‍या दोघांच्या तावडीतून सोडविले. याप्रकरणी दोघांविरोधात (nashirabad police) नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

१६ वर्षीय मुलगी भादली गावात कुटुंबियांसह राहते. यादरम्यान दयानंद कोळी व दादू कोळी दोन्ही रा. कानसवाडा ता. जळगाव, हे दोन्ही आले. या दोेघांनी पांढर्‍या रंगाच्या तवेरा गाडी क्रमांक एम.एच.१५ डी.सी. ९९४४ यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला घेवून जाण्याचा प्रयत्न केला. घटना लक्षात आल्याने तातडीने मुलीच्या कुटुंबियांनी घटनास्थळ गाठले. व दोघांच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका केली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन नशीराबाद पोलिसात अपहरण करणार्‍या दयानंद कोळी व दादू कोळी दोन्ही रा. कानसवाडा ता. जळगाव यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अलीयार खान हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या