Friday, May 3, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद जिल्ह्याचा निकाल 99.14 टक्के

औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल 99.14 टक्के

औरंगाबाद – Aurangabad

अखेर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (ssc result) शुक्रवारी जाहीर झाला. यात औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल 99.14 टक्के एवढा लागला आहे अंतर्गत मूल्यमापनाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला आहे. मुला-मुलींनी निकालात चांगले गुण मिळवत समान बाजी मारली आहे. दरम्यान, मंडळाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर वेबसाइटमध्ये तांञिक अडचण निर्माण झाली. यामुळे विद्यार्थ्यांना तब्बल 4 तास निकाल पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थी हताश झाले होते.

- Advertisement -

दरम्यान, आता निकालात विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचा मोठा फायदा झाला आहे. विद्यार्थी मोठे गुण घेऊन पास झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल 99.14 टक्के एवढा लागला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून 62 हजार 924 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदवले होते.

यात 62 हजार 919 विद्यार्थी प्रविष्ट ठरले. यात 35 हजार 43 मुले, तर 27 हजार 876 मुली आहेत. 62 हजार 904 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात 35 हजार 35 मुले, तर 27 हजार 869 मुली उतीर्ण झाल्या आहेत. टक्केवारीनुसार 99.14 टक्के विद्यार्थी यावेळी उत्तीर्ण झाले आहेत.

मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर झाला. माञ, वेबसाइटमध्ये तांञिक अडचण निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना पाच तासानंतर देखील निकाल पाहता आला नव्हता. त्यामुळे, विद्यार्थी व पालकांत प्रचंड असंतोष पसरला होता. वेबसाइटमध्ये वारंवार समस्या निर्माण होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष अनावर झाला होता.

औरंगाबाद जिल्ह्यात 2 हजार 795 पुर्नपरीक्षार्थी होते. यात 2 हजार 129 मुले, तर 666 मुली आहे. दरम्यान 2 हजार 250 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात 1 हजार 764 मुले, तर 486 मुली आहेत. टक्केवानुसार 80.50 विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या