Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रअयोध्येतील राम मंदिरावर सर्वांचा हक्क असावा यासाठी 'निधी संकलन'

अयोध्येतील राम मंदिरावर सर्वांचा हक्क असावा यासाठी ‘निधी संकलन’

औरंगाबाद – Aurangabad – प्रतिनिधी :

400 पेक्षा जास्त वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत राहिलेले प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान मंदिर उभारणीचे कार्य 5 ऑगस्ट 2020 पासून सुरू झाले आहे.

- Advertisement -

मंदिराच्या उभारणीचा खर्च उचलण्याचे आवाहन केले तर काही मोठे लोक पटकन पुढे येऊन वाट्टेल तितका निधी उभा करतील, परंतु हे राम मंदिर आपल्या सर्वांचे असून आपल्या परीने दिला जाणारा निधी हा आपला मंदिरावरचा अधिकार दर्शवणारा ठरणार आहे. त्यामुळेच प्रत्येक भारतीय या निधी संकलनात सहभागी होऊ शकतात अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मांडण्यात आली.

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचा संपूर्ण खर्च उचलण्याची अनेक दानशूरांची तयारी आहे. मात्र मंदिरासाठी देशभरातून वर्गणी गोळा केली जात आहे.

यामुळे मंदिर कोणा एकाच्या मालकीचे राहणार नसून प्रत्येक जण याचा मालक झाला आहे. आज केलेल्या योगदानातून याची मालकी पुढील पिढ्यापर्यंत पोहचणार आहे.

मात्र, कोणी आपल्यामुळेच राम मंदिर झाल्याचा दावा करत असेल तर त्याचा आनंदच असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेच्या विदेश विभागाचे केंद्रीय सचिव प्रशांत हरताळकर यांनी व्यक्त केले. त्यांना असा दावा करण्यास भाग पाडल्याचे समाधान असल्याचे ते म्हणाले.

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि विहिंपने राम मंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी जमा करण्याच्या अभियानाला सुरुवात केली आहे. औरंगाबादमध्ये १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान अभियान चालेल.

देशभरात १३ कोटी कुटुंबापर्यंत पोहचण्याचं लक्ष आहे. ८ दिवसातच २५ टक्के उद्धिष्टपूर्ती झाली असून सर्व धर्मियांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे हरताळकर यांनी सांगीतले.

अभियानाचा आढाव घेण्यासाठी ते बुधवारी औरंगाबाद शहरात आले असता दिव्य मराठीशी संवाद साधला. विहींपच्या देवगिरी प्रांताचे संघटनमंत्री अभिजीत हारकारे आणि किशोर शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या