Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादची स्मार्ट सिटी बस देशात 'अव्वल'

औरंगाबादची स्मार्ट सिटी बस देशात ‘अव्वल’

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबादच्या स्मार्ट सिटी (Smart City) बसने अर्बन मोबिलिटी गटात इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड (India Smart City Award) जिंकून पहिला क्रमांक पटकावला आणि इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्डस्ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. (Government of India) भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने ही घोषणा केली. (Aurangabad) औरंगाबाद शहराने सुरत (Surat) आणि अहमदाबाद (Ahmedabad) या शहरांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

शहरी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) (शहरी) आणि स्मार्ट सिटी मिशनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्मार्ट सिटी अवॉर्डस् ची घोषणा करण्यात आली. व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंग (Video conferencing) पध्दतीने झालेल्या या कार्यक्रमाला (Urban Development Minister Hardip Singh Puri) शहरी विकासमंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणालकुमार उपस्थित होते. औरंगाबादहून या कार्यक्रमातऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय (Chief Executive Officer Astik Kumar Pandey), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, स्मार्ट सिटीची टीम सहभागी झाली होती.

औरंगाबाद शहरात 23 जानेवारी 2019 रोजी स्मार्ट सिटी बससेवा सुरू करण्यात आली. यासाठी शंभर बस खरेदी करण्यात आल्या, 32 मार्गांवर या बस चालवल्या जातात. पूर्ण क्षमतेने या बस चालल्यास दिवसभरात त्या 22 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतात. आतापर्यंत स्मार्ट सिटी बसने 52 लाख किलोमीटरचा प्रवास करीत 87 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची सेवा केली आहे. (Central Government) केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने अर्बन मोबिलिटी गटात या सिटी बस सेवेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या