Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगावात तीन दिवस रंगणार लोककलेचा जागर

जळगावात तीन दिवस रंगणार लोककलेचा जागर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

खान्देशातील विविध लोककले च्या (Folklore) जतन व संवर्धना सोबतच ह्या लोककलां ची माहिती नव्या पिढीला मिळाली तसेच काळाच्या ओघात नामशेष होणा-या या कलेला नव संजीवन मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय (Directorate of Cultural Affairs ) मुंबई यांच्या वतीने खान्देशात प्रथमच या महोत्सव (Festival) आयोजन होत आहे दि 4 मार्च ते 6 मार्च असा तिन दिवस चालणा-या या महोत्सवाचे आयोजन जळगावात होत असून जळगाव च्या नवीन बस स्थानका शेजारील राष्ट्रपिता महात्मा गांधी गांधी उद्यानात या महोत्सवाचे आयोजन रोज सांयकाळी 7 ते 10या वेळेत करण्यात आले आहे

- Advertisement -

भारतीय स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सवाच्या (Amrit Mahotsava) निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री ना अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन होत आहे. खान्देशातील लोककलावंना (Folk artist) शासनस्तरावर आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, खान्देशातील पारंपारीक लोककलेच्या सन्मान व्हावा या लोककलेत कार्यरत कार्य करणा-या लोककलावंताचा (Folk artist) यथोचित गौरव व्हावा या उद्देशाने शासनाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन होत आहे.

या महोत्सवात खान्देशातील नऊ वहीगायन मंडळे (Vahigayan Mandals) सहभागी होणार असून वहीगायन या लोककलेच्या सादरीकरणाने तिन दिवस हा महोत्सव रंगणार आहे या महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार दि 4 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता मान्यवरांचच्या उपस्थितीत होणार आहे. ग्रामीण भागातील लोककलावंताचा कला अविष्कार (Art invention) पहाण्यासाठी जळगाव च्या कला रसिक नागरीकांनी या महोत्सवाला यावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय व संचालक बिभीषण चौरे यांनी केले आहे

समन्वकपदी विनोद ढगे

महोत्सवाचे आयोजन व नियोजना साठी शासनाच्या वतीने खान्देशातील लोककलेचे आभ्यासक, संघटक व लोककलावंत विनोद ढगे (Vinod Dhage) यांची समन्वयक म्हणून शासनाने निवड केली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या