पुणे |प्रतिनिधी| Pune
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते बाबा आढाव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते, त्यातच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज संध्याकाळी त्यांचे निधन झाले आहे. बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकर्यांचे नेते होते. त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केले.
दोन दिवसांपूर्वीच शरद पवार हे बाबा आढाव यांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. त्यांनी बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरु असताना रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती.
1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. ते 94 वर्षांचे होते.




