Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रहभप बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीचे निधन

हभप बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीचे निधन

मुंबई | Mumbai

- Advertisement -

ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर (baba maharaj satarkar) यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर (८५) (rukmini satarkar) यांचे निधन झाले. नेरुळमध्ये त्यांनी वयाच्या अखेरचा श्वास घेतला…

बाबा महाराज सातारकर यांच्या अध्यात्माच्या विचार प्रसाराच्या कार्यात त्यांनी सक्रीय योगदान दिले. रूक्मिणी सातारकर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती सातारकर कुटुंबियांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनो बातमी तुमच्यासाठी! दहावी-बारावीच्या परीक्षांपूर्वी बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बाबा महाराज सातारकर यांनी १९८३ पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन; ‘या’ उपोषणामुळे आले होते राज्यभर चर्चेत

त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केली आहे. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते. बाबा महाराज सातारकर यांच्या धार्मिक कार्यात त्यांच्या पत्नी रुक्मिणी उर्फ माईसाहेब यांचीही मोलाची साथ होती.

धक्कादायक! भांडण झाल्याचा राग अनावर, ‘त्याने’ कुटुंबातील तिघांवर चढवली रेंज रोव्हर

- Advertisment -

ताज्या बातम्या