नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बाबा वंगा (Baba Vanga Predictions) हे नाव कोणाला माहित नाही, असे कदाचितच कोणी असेल. बाबा वंगा आणि त्यांच्या भविष्यवाण्यांच्या चर्चा संपूर्ण जगभरात होत असते.जगाचा निरोप घेऊन जवळपास तीन दशके झाली तरी त्यांनी केलेली भाकितं आजही जगात चर्चेत असतात. २०२४ साठी बाबा वेंगाने केलेली भविष्यवाणी भीतीदायक आहे.
युरोपीय देशात दहशतवादी हल्ले
पुढच्या वर्षभरात एखादा मोठा देश जैविक अस्त्रांची चाचणी किंवा हल्ला करेल, अशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, पुढच्या वर्षी एक मोठा देश जैविक शस्त्रांची चाचणी घेईल किंवा जैविक शस्त्रांचा वापर करुन हल्ला करेल. तसेच, दहशतवादी युरोपवर निशाणा साधणार असून युरोपातील विविध शहरांमध्ये ते हल्ले करतील.
पुतिनची हत्या
बाबा वंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, नव्या वर्षात पुतिन यांची हत्या केली जाऊ शकते. रशियातीलच कोणीतरी त्यांची हत्या करेल, असा अंदाज बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामपंचायत उमेदवाराच्या पतीवर रात्री झाला जीवघेणा हल्ला; दोन्ही गटात तुंबळ हाणामारी
आर्थिक संकट येईल
जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते, असा मोठा दावा बाबा वंगा यांनी आपल्या भविष्यवाणीतून केला आहे. आर्थिक संकटाची कारणेही उघड केली आहेत. कर्जात वाढ आणि भू-राजकीय तणावामुळे आर्थिक संकट येईल, असंही भाकित वर्तवले आहे.
पृथ्वीवरील वातावरण बदल
पुढील वर्षी नैसर्गिक आपत्ती आणि खराब हवामानाचे पृथ्वीवर विपरीत परिणाम पाहायला मिळतील असे भाकीत बाबा वंगा यांनी केले आहे. वंगाच्या मते, पृथ्वीच्या कक्षेत बदल होणार आहे. हे फार कमी कालावधीसाठी होईल, परंतु त्यामुळे हवामान बदलाचे भयानक परिणाम दिसून येतील.
कांद्याच्या दरामाध्ये घसरण सुरुच; केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
सायबर हल्ले वाढतील
येत्या वर्षात जगभरात सायबर हल्ले वाढतीत. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.अडव्हान्स हॅकर्स पॉवर ग्रीड्स आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट्ससारख्या गंभीर पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील, असं बाबा वंगा यांनी म्हटलं आहे. यामुळे राष्ट्रीय स्तरावर सुरक्षेला धोका निर्माण होईल, असा अंदाज बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे.
कॅन्सरवर औषध
बाबा वंगा यांच्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातून चांगली बातमी येऊ शकते. अल्झायमरसह कॅन्सरसारख्या आजारांवर नवे उपचार उपलब्ध होणार आहेत. २०२४ मध्ये कॅन्सरवर उपचार करणे शक्य होईल, असा अंदाजही बाबा वंगा यांनी व्यक्त केला आहे.