Thursday, May 2, 2024
Homeनगरबाभळेश्वर-श्रीरामपूर रसत्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत

बाभळेश्वर-श्रीरामपूर रसत्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत

राजुरी |वार्ताहर| Rajuri

बाभळेश्वर ते श्रीरामपूर रोडवर अनेक छोटे-मोठे खड्डे पडले असल्यामुळे या रोडवरून जाणारे येणार्‍या दुचाकी-चारचाकी

- Advertisement -

वाहनांतून प्रवास करणार्‍या नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून खड्डे चुकवण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात घडत असून यामध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आह तर अनेक दुचाकीस्वार जखमी होत आहे.

या रस्त्यावर छोटे मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्यातच उसाची वाहतूक करणार्‍या ट्रक चालक, बैलगाडी, ट्रॅक्टर चालक या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याची सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन खड्ड्यांवर डांबरीकरण करावे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर खड्डे बुजवावे, अशी मागणी जोर धरू लागली असून हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने न बुजवल्यास कोणतीही सूचना न देता बाभळेश्वर चौकात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या भागातील नागरिकांच्यावतीने देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या