Tuesday, February 3, 2026
Homeनगरबाभळेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू

बाभळेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू

बाभळेश्वर |वार्ताहर|Babhleshwar

राहाता तालुक्यातील बाभळेश्वर गावामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. मंगळवारी रात्री बाभळेश्वर-प्रवरानगर फाट्या जवळील म्हसोबा मंदिराच्या परिसरातील ओम सर्जेराव पवार यांच्या मालकीचा घोडा घराच्या जवळ बांधलेला असताना मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने घोड्यावर हल्ला करून मानेच्या जवळ तसेच पोटाच्या मागच्या भागाजवळ हल्ला केला. या झटापटीमध्ये घोड्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

ओम सर्जेराव पवार यांच्याकडे घोडा बैल तसेच इतर त्यांच्या गाय व शेळ्या सुद्धा या ठिकाणी होत्या. मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना बिबट्याने हा हल्ला केला. घटनेनंतर वन विभागाच्या कर्मचार्‍यांशी संपर्क साधून माहिती दिली. वनविभागाचे पी. बी. गजेवार यांनी पंचनामा केला. परिसरात तीन ते चार दिवसापासून बिबट्याचे दर्शन होत आहे. बाभळेश्वर लोणी रोडवर आहेर वस्ती, आरगडे मळा, तांबे वस्ती, बेंद्रे वस्ती, दत्तनगर, म्हसोबा मंदिर, म्हस्के वस्ती, प्रवरानगर रोडवरील जोशी वाडा परिसरातील नागरिकांना तसेच ऊस तोडणार्‍या गाडी वाहनांना सुद्धा बिबट्याचे दर्शन दिल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

YouTube video player

रोडवर अक्षरशः आठ वाजताच सामसूम होताना दिसत आहे. रात्रीच्या वेळी अक्षरशः घराबाहेर निघणे सुद्धा मुश्किल झालेले आहे. बाभळेश्वर परिसरात कमीत कमी पाच ते सहा बिबटे असण्याची शक्यता आहे कारण सर्वच बिबटे उंचीनुसार कमी जास्त आहे. तसेच त्यांना पिल्ले सुद्धा झालेले आहेत. त्यांचे सुद्धा दर्शन लोकांना मिळालेले आहे. बाभळेश्वर-लोणी रोड तसेच प्रवरानगर रोडवर स्ट्रीट लाईट नसल्यामुळे दोन्ही रोडवर अक्षरशः अंधार आहे.

सध्याला कारखाना चालू झाल्यामुळे कर्मचार्‍यांना कामावर जाणे सुद्धा बिबट्याच्या भीतीने मुश्किल झाले आहे. शेतकरी शेतात काम करण्यासाठी घाबरत तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये शाळेत जाताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वन विभागाने त्वरित बाभळेश्वर गावामध्ये पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व बाभळेश्वर, दत्तनगर ग्रामस्थ करीत यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...