Friday, May 3, 2024
Homeनाशिकदिंडोरी : निळवंडी, पालखेड रस्त्याची दुरावस्था

दिंडोरी : निळवंडी, पालखेड रस्त्याची दुरावस्था

दिंडोरी । Dindori

दिंडोरी शहरातील पालखेड व निळवंडी रस्त्याची चाळण झाली असुन बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यांची कामे करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

दिंडोरी चौफुली-निळवंडी रस्ता आणि दिंडोरी चौफुली पालखेड रस्ता हे अनुक्रमे दिंडोरी पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्व यांच्याकडे आहेत. परंतु रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने सध्या बांधकाम विभागाचे पितळ पावसाळ्यात उघडे पडते. निळवंडी चौफुलीवर प्रचंड खड्डे पडले आहे. ते पंचायंत समिती चालवणार्‍या नेत्यांंनाही आणि प.स.च्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनाही दिसत नाही.

तीच गोष्ट पालखेड रस्त्याची आहे. पालखेड रस्त्यावर तर प्रचंड खड्डे पडल्याने ग्राहकांना आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. पालखेड एमआयडीसीतुन येणार्‍या वाहनांमुळे तर खड्डयांची संख्या वाढली आहे. त्यात पालखेड रोडवरील अनेक व्यापार्‍यांनी दिंडोरी नंगरपंचायतीने टाकलेल्या गटारी बंद केल्यामुळे पाणी रस्त्यावर साचते व खड्डेही पडतात.

संबधित विभागांनी तातडीने डागडुजी करुन रस्ते किमान पावसाळा जाईपर्यत दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दिंडोरी शहरातील पालखेड रस्त्याला 3 कोटी रुपयांचा निधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मंजुर केला आहे.यापुर्वीही पंधरा वर्षात त्यांनीच या रस्त्याला निधी दिलेला आहे.आता तांत्रिक बाबी पुर्ण झाल्यानंतर निविदा निघुन सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पालखेड रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.

– अविनाश जाधव,राष्ट्रवादी कॉग्रेस

- Advertisment -

ताज्या बातम्या