मुंबई | Mumbai
बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. कल्याण कोर्टाने अक्षय शिंदे याला २६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी आरोपीने अशा प्रकारचे अजून काही लैंगिक शोषण व कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
आरोपीने अशा प्रकारचे अजून काही लैंगिक शोषण व कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. तो हे कृत्य करण्यासाठी काय करत होता? कशा रितीने आणि काय सांगून तो मुलींना आपल्या सोबत न्यायचा? याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष महिला पोक्सो न्यायाधीश V A पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आले होते. त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित
आंदोलनाबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दुर्दैवाने लाखो प्रवाशांना त्रास झाला. ८ तास रेल्वे बंद होती. हे व्हायला नको होतं. त्यातही मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक होते. कालचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते. आंदोलनात स्थानिक लोक असतात पण इथे इतर ठिकाणाहून गाड्या भरून आंदोलक आले. सगळ्या मागण्या मान्य केल्या तरी हटत नव्हते. त्यांना सरकारला बदनाम करायचे होते.
पालकमंत्र्यांची घोषणा
दरम्यान, बदलापूरमधील धक्कादायक घटनेनंतर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमा असे आदेश मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. शैक्षणिक संस्थेत आत्मरक्षणासाठी अभियान सुरु करा, शैक्षणिक संस्थांमधील चालक, वाहक, कँटीन कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांची पोलीस पडताळणी बंधनकारक करा, महिला पालकांची समिती नेमून प्रत्येक महिन्याला सुरक्षा आढावा घ्या, अशाही सूचना त्यांनी दिले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा