Monday, July 8, 2024
Homeदेश विदेशजबरदस्त मायलेज असलेल्या जगातील पहिली CNG बाईक बजाज कंपनीकडून लॉंच

जबरदस्त मायलेज असलेल्या जगातील पहिली CNG बाईक बजाज कंपनीकडून लॉंच

मुंबई | Mumbai
बाइकच्या दुनियामध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक अशी घटना घडली आहे. भारतीय कंपनी बजाज ऑटोने जगातली पहिली अशी सीएनजी बाइक अखेर लाँच केली असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्याहस्ते आज या बाईकच्या लाँचिंगचा सोहळा पार पडला.

- Advertisement -

ऑटोमोबाईल क्षेत्रात नव्या क्रांतीची बीज रोवणारा हा लाँचिंग सोहळा चर्चेत ठरला तो बजाज कंपनीने केलेल्या दाव्यामुळे. कारण, सीएनजीवर धावणारी ही जगातील पहिली दुचाकी असल्याचा दावा बजाज कंपनीने केला आहे. बजाजने एकूण ३ मॉडेल लाँच केले आहे. हे तिन्ही मॉडेल हे बजेटमध्ये बसणार आहे. यामध्ये सर्वात कमी ही ९५ हजार रुपये किंमत आहे.

बजाज फ्रीडम सीएनजी असं या बाइकचं नाव आहे. या बाइकची किंमत ९५,००० असणार आहे. एकूण अशी ३ मॉडेल आहे. यामध्ये फ्रीडम १२५ NG04, फ्रीडम १२५ NG04ड्रम एलईडी, फ्रीडम १२५ NG04 ड्रम अशी मॉडेल आहे. फ्रीडम १२५ NG04 ची किंमतही १ लाख १० हजार असणार आहे. तर फ्रीडम १२५ NG04 ड्रम एलईडी ची किंमत १ लाख ५ हजार असणार आहे. तर फ्रीडम १२५ NG04 ड्रमची किंमत ९५ हजार असणार आहे.

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आज पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेळी, भारत हा वाहनउद्योग क्षेत्रात अगोदर सातव्या क्रमांकाचा देश होता, आता तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली. तसेच, या सीएनजी बाईकची किंमत 1 लाखांपेक्षा कमी असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

असे असणार फिचर्स
१२५ सीसी
२ किलोची सीएनजी टाकी
सीएनजी टाकी ही सीटच्या खाली बसविण्यात आली आहे.
सीएनजी टाकीसाठी पेट्रोल टाकीच्या वरपर्यंत सीट घेण्यात आलं आहे.
२ लिटर पेट्रोल टँकही आहे
२३० किमी एव्हरेज (सीएनजी आणि पेट्रोल मिळून)

या बाइकमध्ये पाच लिटर पेट्रोल साठवण्याची क्षमता असलेली एक लहान फ्युएल टँक बाइकमध्ये आहे. बाइकच्या व्हीलबेसवर एक लांब सीट आहे आणि त्याखाली सीएनजी टँक बसवण्यात आली आहे. सीएनजी आणि पेट्रोल इंधनाची एकत्रित क्षमता असल्यामुळे ही गाडी पारंपरिक १२५ सीसी बाइकप्रमाणे रेंज देण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या