Friday, May 3, 2024
HomeUncategorizedLata Mangeshkar : जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?

Lata Mangeshkar : जेव्हा बाळासाहेब लता दिदींना म्हणाले, राजकारणात येता का?

मुंबई | Mumbai

गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar Passed Away) यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं.

- Advertisement -

जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. लतादीदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे.

लता दीदींना आधी करोना आणि नंतर न्युमोनियाची लागण झाली होती. लता दीदी आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाते सर्वश्रृत आहे. लतादीदींनी बाळासाहेबांना मोठा भाऊ मानायच्या. तर, बाळासाहेबदेखील लता दीदींच्या प्रत्येक अडचणीत त्यांच्यासोबत उभे असायचे.

Lata Mangeshkar : लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

लता मंगेशकर यांना बाळासाहेबांनी राजकारणामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आणि त्यावर लतादीदींनी दिलेलं उत्तर आजही चर्चेचा विषय ठरतो. जेव्हा बाळासाहेबांनी लतादीदींना राजकारणामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.

त्यावर लतादीदी म्हणाल्या की, “राजकारण हा आमचा प्रांत नाही. आपण राजकारणात खूप चांगलं काम करताय. आपल्याला माझ्या शुभेच्छा” त्यानंतर कधीही बाळासाहेबांनी राजकारणाचा विषय देखील लतादीदींसमोर काढला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या