Wednesday, January 7, 2026
HomeनगरCrime News : बालिकाश्रम रस्त्यावर नोकरदाराचे घर फोडले

Crime News : बालिकाश्रम रस्त्यावर नोकरदाराचे घर फोडले

सोन्याचे दागिने, रोकड व कागदपत्रे लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील आयोध्या कॉलनी येथे राहणार्‍या एका नोकरदार व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 17 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विजय भाऊसाहेब शिरसाठ (वय 32) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (2 जून) रात्री फिर्याद दाखल केली आहे.
विजय शिरसाठ हे 31 मे रात्री नऊ वाजता आपल्या मूळगावी पिपंळगाव टप्पा (ता. पाथर्डी) येथे गेले होते. दुसर्‍या दिवशी म्हणजेच 1 जून रोजी सकाळी 6.45 वाजता त्यांना घरमालकाचा पुतण्या प्रसाद रमेश चिपाडे यांचा फोन आला. त्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची व घराबाहेर दोन पर्स अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत असल्याची माहिती दिली.

- Advertisement -

या माहितीवरून विजय शिरसाठ सायंकाळी पाच वाजता ते त्यांच्या राहत्या घरी पोहोचले. घरी आल्यावर त्यांना कपाट उघडे असल्याचे व घरातील सामान अस्ताव्यस्त झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तपासणी केली असता कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कामावरील बॅग चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीस गेलेल्या ऐवजात चार ग्रॅमचे सोन्याचे चेन, 0.5 ग्रॅमचे सोन्याचे झुमके, 0.5 ग्रॅमचे 50 मणी, चार हजार रूपयांची रक्कम, बॅग, ज्यात आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, आर. सी. बुक, वाहन चालविण्याचा परवाना व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार दीपक जाधव करीत आहेत.

YouTube video player

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...