Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडाबाळू बोडके उत्तर महाराष्ट्र केसरी

बाळू बोडके उत्तर महाराष्ट्र केसरी

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

धर, पकड,उचल,टाक अशा आरोळ्या व हलगीचा गजर अशा वातावरणात रंगलेल्या काटा कुस्तीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन बाळू बोडके याने राज्य रौप्यपदक विजेता विकास मोरेला 6-5 असे एका गुणाने पराभूत करीत उत्तर महाराष्ट्र केसरीची मानाची गदा व रोख रुपये 51हजाराचे पारितोषिक पटकावले.

- Advertisement -

पांढुर्ली येथे लोकनेते स्व.शांतारामभाऊ ढोकणे यांचे स्मरणार्थ आयोजित 11 व्या उत्तर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा झाल्या.यावेळी केसरी गटात तृतीय बक्षिसाचा मानकरी धर्मा शिंदे ठरला. तर अतिशय नेत्रदीपक झालेल्या महिलांच्या कुस्ती स्पर्धेत सुप्रिया तुपे ही अंतिम विजेता ठरली.

स्पर्धा उद्घाटन व पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आ.अ‍ॅड. माणिकराव कोकाटे,शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, माजी जि. प. सदस्य सीमंतिनी कोकाटे,दीपक बलकवडे, उपस्थित होते. विविध गट विजेत्यांना उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष उत्तम दळवी, अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे, प्रा. रवींद्र मोरे. प्रा. मधुकर वाघ, सरपंच पंढरीनाथ ढोकणे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विश्राम शेळके, सोपान दिवटे, झुंजार पवार, पोपटराव वाजे, सुनील उगले, योगेश पवार, पिंटू चौगुले यांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून चेतक बलकवडे, दीपक पाटील, दीपक जुंद्रे, प्रवीण पाळदे, लक्ष्मीकांत पाटील यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल

कुमार गट: 35 किलो, प्रथम – मयूर कडू, द्वितीय – मयूर शिंदे.40 किलो, प्रथम – तुषार कडू, द्वितीय – शुभम जुंद्रे. 45 किलो, प्रथम – समीर ठमके, द्वितीय – ओम भगत.50 किलो, प्रथम क्र. कुणाल टोपडे, द्वितीय क्र.ओम बिन्नर.

पुरूष गट :57 किलो, प्रथम – तुषार घारे,द्वितीय – रोहित परदेशी.61 किलो,प्रथम – शुभम बोराडे, द्वितीय – कुणाल आव्हाड. 65 किलो, प्रथम – पवन डोनर, द्वितीय- संकेत झोमन.70 किलो,प्रथम – भाऊसाहेब सदगीर, द्वितीय – प्रार्थ कमाले.74 किलो, प्रथम – निलेश जाधव, द्वितीय- हरीश पवार.

महिला गट : 65 किलो,सुप्रिया तुपे.60 किलो, भक्ती आव्हाड. 55 किलो,संस्कृती शिरसाट.50 किलो, तुळशी पाथरे.46 किलो, भाग्यश्री मस्के . 40 किलो, प्रतिभा सारकते ,35 किलो* अक्षदा झनकर.

केसरी गट : बाळू बोडके (प्रथम), द्वितीय विकास मोरे.(द्वितीय) धर्मा शिंदे(तृतीय).

- Advertisment -

ताज्या बातम्या