Friday, June 21, 2024
Homeनाशिकउद्धव ठाकरेंना सत्तेचा मोह, बाळासाहेबांना त्यांची क्षमता..; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंना सत्तेचा मोह, बाळासाहेबांना त्यांची क्षमता..; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

नाशिक | Nashik

- Advertisement -

देशभरात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत विविध राज्यांसह देशात तीन टप्प्यातील मतदान (Voting) पार पडले आहे. तर उर्वरित टप्प्यातील मतदान १३, २०, २५ मे आणि १ जून रोजी होणार असून ४ जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ होतांना दिसत आहे. उर्वरित टप्प्यात होणाऱ्या मतदानामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश असून २० मे रोजी याठिकाणी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये आले होते. यावेळी प्रचाराच्या सभेत बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

हे देखील वाचा : Nashik Loksabha 2024 : हेमंत गोडसेंनी घेतली मंत्री भुजबळांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) कधीही सत्तेचा मोह नव्हता. ते नेहमी किंगमेकरच्या भूमिकेत असायचे. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सत्तेचा मोह आहे. फार पूर्वीपासून उद्धव ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्री (CM) होण्याची इच्छा होती. पंरतु, बाळासाहेबांनी ती कधीही पूर्ण होऊ दिली नाही. कारण बाळासाहेबांना यांची क्षमता माहिती होती. त्यामुळे जर आज बाळासाहेब असते तरी त्यांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केलं नसतं, असं एकनाथ शिदेंनी म्हटले.

हे देखील वाचा : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, “आज ठाकरे गटाचे लोक म्हणत आहेत की आमच्या बाजुने सहानुभूतीची लाट आहे. मात्र,
बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी करणाऱ्यांना कधीही जनतेची सहानुभूती मिळू शकत नाही. लोकांच्या मदतीला धावून जाणे, शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणे, असे काम लोकांना पाहिजे असतं, पंरतु, ज्यावेळी काम करायची वेळ होती त्यावेळी उद्धव ठाकरे केवळ फेसबुक लाईव्ह करत होते, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच हे आम्हाला सारखे गद्दार, गद्दार असे म्हणतात, उद्या जर निवडणुकीत मतदारांनी यांना साथ दिली नाही, तर ते मतदारांनाही गद्दार म्हणायला मागेपुढे पाहणार नाही”, असेही एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) यावेळी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवकाचा खून

ते पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्ते आणि नेते संपवण्याचे काम केले आहे. शिवतीर्थावरील सभेत त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना व्यासपीठावरून खाली उतरवलं, त्यांचा अपमान केला. असाच आणखी एक प्रकार रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यासोबत होणार होता, त्यावेळी मी त्यांना सभेला अजिबात येऊ नका म्हणून सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंनी कुणी मोठं होत असेल, तर त्यांना मोठं होऊ दिलं नाही. त्यामुळे पक्ष वाढणार तरी कसा, मोठा होणार तरी कसा?” असा सवालही यावेळी शिंदेंनी ठाकरेंना विचारला.

हे देखील वाचा : एकनाथ शिंदे २०१३ सालीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

- Advertisment -

ताज्या बातम्या