Sunday, May 19, 2024
Homeजळगावबंदी चिंग्याकडून पोलिसाला मर्डरची धमकी

बंदी चिंग्याकडून पोलिसाला मर्डरची धमकी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

उपचारासाठी (treatment) शासकीय रुग्णालयातून (Govt Hospital) कारागृहात दारुच्या नशेत (Drunk) आलेल्या बंदीला कारागृहात (prison) उशिरा घेतले. त्यामुळे बंदी चेतन सुरेश आळंदे उर्फ चिंग्या याने पोलिसांना (police) अश्लिल शिवीगाळ (Obscene abuse) करीत त्याचा 24 तासात मर्डर करण्याची (Murder threat) धमकी दिल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कारागृहातील शिपाई राहुल राम घोडके व गजानन चव्हाण यांची दि. 9 रोजी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ड्युटीला होते. तर गेटच्या आत त्यांचे सहकारी गुडन तडवी, संजय राठोड, शिवाजी कोसोदे, होम दीपक कोळी हे होते. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील कर्मचारी उमेश धनगर हा कैदी चेतन सुरेश आळंदे उर्फ चिंग्या व भगवान लक्ष्मण सुरवाडे यांना सकाळी उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय रुग्णाालयात घेवून गेले होते. उपचारानंतर सायंंंकाळी त्याला कारागृहात दाखल करण्यासाठी आणले.

यावेळी कारागृहातील पोलिसांनी त्याची तपासणी केली. यावेळी चेतन उर्फ चिंग्या हा दारुच्या नशेत असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तात्काळ वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील, तुरुंग अधीक्षक एस. पी. कवार यांना याबाबत माहिती दिली.अधिकार्‍यांनी तात्काळ धाव घेतली.

दारुच्या नशेतील बंदीला घेतले कारागृहात

ड्युटीवर असलेल्या कर्मचार्‍यांनी बंदी चेतन उर्फ चिंग्याला कारागृहात घेण्यास नकार दिला. तेव्हा त्यांचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील व एस. पी. कवार यांनी बंदीला ताब्यात घेवून टाकण्याचे आदेश दिले. वाटल्यास आरोपी दाखल होतेवेळी नंबर 11 वर स्वाक्षरी करतो असे त्यांनी सांगितले. त्यानुसार कर्मचार्‍यांनी दारुच्या नशेत असलेल्या चिंग्याला दाखल करुन घेतले.

खोटा गुन्हा दाखल करुन नोकरीच घालवतो

दारुच्या नशेतील बंद्याला कारागृहात घेतल्यानंतर तो जोरजोरात आरडाओरड करु लागला. तसेच मला गेटमध्ये उशिरा का घेतले असे म्हणत त्याने पोलिसांना अश्लिल शिवीगाळ त्यांच्याशी हुज्ज घालून धक्काबुक्की लागला. तसेच तुझा 24 तासात मर्डर करुन टाकेल आणि तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करुन तुझी नोकरीच घालवेल अशी धमकी देखील त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी आज कारागृहत पोलीस राहूल घोडके यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या