Saturday, October 19, 2024
Homeदेश विदेशBangladesh Political Crisis : मोहम्मद युनूस होणार बांगलादेशचे नवे पंतप्रधान?

Bangladesh Political Crisis : मोहम्मद युनूस होणार बांगलादेशचे नवे पंतप्रधान?

दिल्ली । Delhi

बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा सोमवारी उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. (bangladesh political crisis) या आंदोलनाने इतके उग्ररुप धारण केले की पंतप्रधान शेख हसिना (Sheikh Hasina) यांना पदाचा राजीनामा देत देश सोडून पलायन करावे लागले. त्यामुळे सध्या संपूर्ण जगाच्या नजरा बांगलादेशकडे वळल्या आहेत.

- Advertisement -

त्यातच आता बांगलादेशचे नवे पंतप्रधान (bangladesh new pm) म्हणून नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस (muhammad yunus) यांचं नाव चर्चेत आलं आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी संघटनांचा युनूस यांना पाठिंबा असून त्यांनीच देशाचं पंतप्रधानपद स्वीकारावं, अशी इच्छा आंदोलकांनी व्यक्त केली आहे. मोहम्मद युनूस हे देशातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते आहेत.

हे हि वाचा : बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला; हॉटेलात ८ जणांना जिवंत जाळलं

दरम्यान, शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी देशाला संबोधित केले. लष्करप्रमुख म्हणाले की, देशात ४८ तासांत अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. आम्ही देशात शांतता परत आणू. आम्ही नागरिकांना हिंसा थांबवण्याची विनंती करतो. मी सर्व जबाबदारी घेत आहे.

देशातील अंतरिम सरकारमध्ये (interim government) १८ जणांचा समावेश करण्यात आला आहे. या सरकारमध्ये प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये बँकिंग, वकील, पत्रकारिता, शिक्षण, अभियांत्रिकी अशा अनेक क्षेत्रांशी संबंधित लोकांना अंतरिम सरकारमध्ये ठेवण्यात आले आहे.

हे हि वाचा : जामखेड येथे गुटखा पकडला; दोघांवर गुन्हा दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या