Tuesday, December 3, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या संकटातून बचावले; हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या संकटातून बचावले; हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग

हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुखरूप

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

आज दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी गेले होते.दरम्यान आज ते हेलिकॉप्टरने आपल्या स्वीय सह्याकांसोब्त पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होत असताना अचानक ढगाळ वातावरण झाले अन् मुसळधार पाऊस सुरू झाला.कोयना बॅकवॉटरच्या अगदी पंधरा फूटपर्यंत हेलिकॉप्टर खाली आले होते.

कोणतीही जमीन आजूबाजूला नसल्याने हेलिकॉप्टर पुन्हा एकदा माघारी दरे या गावाच्या दिशेने निघाले. जेथून टेकऑफ घेतला होता, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

यावेळी महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वजण सुखरुप आहोत. असे मुख्यमंत्र्यांच्या टीमकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या