Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशकाश्मीरमध्ये शिक्षिकेनंतर दहशतवाद्यांनी केली बँक मॅनेजरची हत्या, घटनेचा VIDEO आला समोर

काश्मीरमध्ये शिक्षिकेनंतर दहशतवाद्यांनी केली बँक मॅनेजरची हत्या, घटनेचा VIDEO आला समोर

दिल्ली Delhi

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) खोऱ्यात अल्पसंख्याकांच्या टार्गेट किलिंगच्या घटना वाढत आहे. दहशतवाद्यांनी मंगळवारी कुलगाममध्ये (Kulgam district) एका सरकारी शाळेतील शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

- Advertisement -

आता दहशतवाद्यांनी (Terrorist) बँकेत घुसून मॅनेजर (Bank Manager) विजय कुमारची (Vijay Kumar) गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्यानंतर विजय कुमार यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दरम्यान जम्मू-काश्मीर खोऱ्यातील हिंदू नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना (Government Employees) दहशतवादी सातत्यानं लक्ष्य करत आहेत. अलीकडेच, बडगाममध्ये काश्मिरी पंडित राहुल भट्ट हत्येविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या