नाशिक | प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र बँक (Maharashtra Bank) कर्मचाऱ्यांकडून आज एकदिवसीय संप (One Day Agitation) पुकारण्यात आला होता. मुंबईच्या डेप्युटी चीफ लेबर कमिशनर (Deputy chief labor commissioner) यांनी केलेली मध्यस्थी विफल ठरल्यामुळे आज या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली….
नोकर भरती (Recruitment) च्या प्रश्नावर बँकेत सफाई कर्मचारी तसेच शिपायांची अनेक पदे रिक्त आहेत. अनेक वर्षापासून जे या पदावर तात्पुरते कर्मचारी म्हणुन काम करत आहेत. त्यांना सेवेत सामावून घ्यावे व ही रिक्त पदे भरावीत. अशी संपकरी संघटनांची मागणी होती. याशिवाय बँकेने अनेक वर्षापासून मृत्यू, निवृत्ती राजीनामा (VRS), पदोन्नती (Promotion) या कारणामुळे रिकाम्या झालेल्या लिपिक पदाच्या रिक्त जागा (Clerical staff shortage) देखील भरलेल्या नाहीत.
बँकेने उघडलेल्या नवीन शाखा (New branch of the bank) आणि वाढलेला व्यवसाय यामुळे निर्माण झालेली अतिरिक्त कर्मचान्याची गरज लक्षात घेता कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार रजा मिळत नाही. मधल्या काळात जनधन, सामाजिक सुरक्षितता विमा योजना, पेंशन योजना, मुद्रा यासारख्या योजनामुळे वाढलेला कामाचा बोजा लक्षात घेता कर्मचाऱ्यांना विलक्षण तणावाखाली काम करावे लागत आहे.
याचा ग्राहक सेवेवर देखील विपरित परिणाम होत आहे. हे लक्षात घेत बँकेने त्वरित बँक शाखा आणि एटीएम येथील सुरक्षारक्षक काढून घेतले आहेत ते त्वरित नमावेत अशी संघटनांची मागणी आहे.
याशिवाय सतर्कता आयोगाचा दाखला देत बँक कोरोना महामारीच्या काळात बँकेतील लिपिक वर्गाच्या बदल्या करून जी अमानवी वागणूक देत आहे. त्यावर देखील संघटनेतर्फे तीव्र आक्षेप घेण्यात येत आहे.
बँकेने त्वरित प्रशासकीय बदल्यांचे आदेश मागे घ्यावेत. २७ सप्टेंबर नंतर २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी दोन दिवसाच्या संपाची हाक संघटनांतर्फे देण्यात आली आहे. दरम्यान बँकेतील दोनही अधिकारी संघटनांनी २७ सप्टेंबर च्या संपाला पाठिंबा जाहीर करत कर्मचारी संघटनांशी समन्वयाने त्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय जाहीर केल्याचे बँकेच्या निवेदनात म्हटले आहे.