Sunday, May 4, 2025
Homeब्रेकिंग न्यूजBaramati Loksabha Election Result : नणंद-भावजयीच्या हाय व्होल्टेज लढतीत सुप्रिया सुळेंची बाजी;...

Baramati Loksabha Election Result : नणंद-भावजयीच्या हाय व्होल्टेज लढतीत सुप्रिया सुळेंची बाजी; अजित पवारांना धक्का

बारामती । Baramati

महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली आहे. राज्यासह देशाचंही लक्ष लागून राहिलेल्या शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांच्या संघर्षात अखेर काकांनीच बाजी मारली आहे. बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत.

- Advertisement -

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार म्हणजेच नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला होता. खऱ्या अर्थाने ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्येच झाली होती. दोघांनी देखील आपला उमेदवार निवडून यावा यासाठी जोरदार प्रयत्न केले होते आणि संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. पण या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना पुन्हा खासदार होण्यात यश मिळाले आहे. सुप्रिया सुळे या मतदारसंघामध्ये चौथ्यांदा खासदार झाल्या आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : आज दोन सामने; दुपारी KKR vs RR तर...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि...