Sunday, May 19, 2024
Homeजळगावपुणे सीबीआयने अटक केलेला बडोदा बँकेचा वसुली अधिकारी कोठडीत

पुणे सीबीआयने अटक केलेला बडोदा बँकेचा वसुली अधिकारी कोठडीत

जळगाव- Jalgaon

चाळीसगाव तालुक्यातील लोंढे येथील शेतकर्‍याने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेवून ट्रॅक्टर घेतले होते. बँकेचे हप्ते थकल्याने ट्रॅक्टर जप्त करण्याची भिती दाखवून 20 हजाराची लाच स्विकारणार्‍या…

- Advertisement -

बँकेचा वसुली अधिकारी प्रशांत विनायकराव साबळे वय 42 रा. औरंगाबाद याला पुणे येथील सीबीआय एसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली होती.

दरम्यान त्याला सीबीआयच्या पथकाने बुधवारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता, एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयतर्फे सरकारी वकील अ‍ॅड.केतन ढाके यांनी काम पाहिले

- Advertisment -

ताज्या बातम्या