Friday, May 3, 2024
Homeनगरबडोदा बँकेतून बनावट धनादेशाद्वारे 89 लाख काढले

बडोदा बँकेतून बनावट धनादेशाद्वारे 89 लाख काढले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट धनादेश बनवून त्याद्वारे एकाच्या बचत खात्यातून 89 लाख काढल्याचा प्रकार नगरमध्ये घडला आहे.

- Advertisement -

याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बिहार राज्यातील छपरा येथील बँक ऑफ बडोदा शाखेतील डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसरच्या बचत खात्यावर दोन बनावट धनादेश बनवून ते नगरमधील सावेडी शाखेतून वटवून तब्बल 89 लाख रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खातेदार संदीप मांगीलाल कोठारी (रा. पोतदार वाडा, हिरवे गल्ली, म्हसोबा मंदिराजवळ, नालेगाव, नगर) याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संदीप कोठारी व गणेश विठ्ठल गावडे (रा. सावेडी) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयाने 3 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत बँक ऑफ बडोदाचे वरिष्ठ शाखाधिकारी संजय डोंगरे (रा. पाईपलाईन रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी कोठारी याने 20 नोव्हेंबरपर्यंत विविध एटीएममधून पैसे काढले आहेत. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या