Friday, May 3, 2024
Homeक्रीडाआयपीएल २०२२ मध्ये 'या' संघाचे पदार्पण

आयपीएल २०२२ मध्ये ‘या’ संघाचे पदार्पण

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) अमेरिकन कंपनी सीव्हीसी कॅपिटल्सने (CVC Capitals) अहमदाबादच्या संघावर (Ahmedabad team) लावलेली महागडी बोली वादात सापडली आहे. तथापि सीव्हीसीला आता हिरवा कंदील मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे…

- Advertisement -

अहमदाबाद संघाचा आयपीएलमधील (IPL) समावेश निश्चित मानला जात असून, याबाबतची अधिकृत घोषणा बीसीसीआय (BCCI) करणार आहे.

सीव्हीसीची सट्टेबाजी कंपनीत कथित गुंतवणूक असल्याचा तपास करण्यासाठी बीसीसीआयने एका पॅनलची नियुक्ती केली होती. न्या . के एस राधाकृष्णन यांच्या त्रिसदस्सीय चौकशी पॅनलने आपला अहवाल बीसीसीआयकडे सोपवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , आयपीएल संचलन परिषद आणि बीसीसीआयने सीव्हीसीच्या आयपीएलमधील सहभागास मंजुरी दिल्याचे कळते.

पॅनलने सीव्हीसीबाबत काढलेल्या निष्कर्षाची तपासणी बीसीसीआयने केली असून, त्याचा स्वीकार करायचा की, नाही याबाबत अंतिम निर्णय बीसीसीआय घेणार आहे. अहमदाबाद संघाला आयपीएल १५ मध्ये आपला सहभाग नोंदवण्यास परवानगी मिळणार हे जवळपास निश्चित आहे.

आयपीएल १५ मध्ये १० संघाचा समावेश असणार आहे. अहमदाबाद आणि लखनौ हे दोन नवीन संघ आयपीएलच्या रणांगणात उतरणार असून, मेगा लिलावामध्ये (Mega Auction) सर्व संघ फेब्रुवारीमध्ये लिलावात सहभागी होणार आहेत.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या