Thursday, May 2, 2024
Homeनाशिकसावधान! डेंग्यू वाढतो आहे, अशी घ्या काळजी

सावधान! डेंग्यू वाढतो आहे, अशी घ्या काळजी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

डेंग्यू (Dengue) हा एक विषाणूजन्य आजार आहे. इडिस डासाच्या (Aedes) चावण्यामुळे हा आजार पसरतो. हा एक फ्लूसारखा (flu) आजार असून संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५ ते ६ दिवसानंतर माणसाला हा आजार होतो. डेंग्यूचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (DHF). दुसरा प्रकार अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असल्याने माणसाचा मृत्यू होण्याची देखील शक्यता असते. डेंग्यूवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात डेंग्यूची लक्षणे आणि उपचारांविषयी (Symptoms and treatment of dengue) माहिती…

- Advertisement -

डेंग्यूची लक्षणे

  • अचानक ताप येणे

  • मळमळ होणे

  • उलट्या होणे

  • तीव्र डोकेदुखी

  • सांधेदुखी, स्नायूंतील वेदना, डोळ्यांच्या मागे वेदना

  • अशक्तपणा

  • ग्रंथींवर आणि लसिका देठांवर सूज येणे

  • घसा दुखणे

  • चवीच्या संवेदनांमध्ये बदल

डेंग्यूचा उपचार

डेंग्यूवर विशिष्ट विषाणूरोधक उपचार केले गेलेले नाहीत. लक्षणांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वत: ची काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यू विषाणूग्रस्त क्षेत्रातून परतल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत आपल्याला ताप किंवा फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच, जर आपण डेंग्यू पसरलेल्या भागात असलात व तुमच्यात डेंग्यूसदृश लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा.

तसेच पुरेशा प्रमाणात द्रव्ये घ्यावीत, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता येणार नाही. ताप कमी करण्यासाठीची औषधे काळजीपूर्वक घेणे व विश्रांती करणे आवश्यक आहे. तपातून बरे होण्यासाठी अँसिटामिनोफेनचा वापर केला जाऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्लाशिवाय डेंगूमध्ये वेदनानाशक (जसे की एस्पिरिन) आणि कॉर्टिकोस्टिरॉईड्स घेऊ नये. त्वचेची पुरळे कॅलमाइन लेपन लाऊन सुधारू शकता. जे रुग्ण सुधरतात त्यांना बाह्य-रुग्ण व्यवस्थेमध्ये ठेऊन त्यांच्यावर देखरेख ठेवली जाते.

असे झाल्यास त्वरित हॉस्पिटलमध्ये भरती व्हा

  • सतत उलट्या होणे

  • उलटीमध्ये रक्त येणे

  • श्वसनाला त्रास

  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे

  • पोटात तीव्र वेदना होणे

  • हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे.

  • तीव्र थकवा आणि अस्वस्थता वाटत वाटणे

जीवनशैलीत असे करा बदल

  • रुग्ण फक्त द्रवपदार्थ घेण्यास सक्षम असेल तर ओआरएस (ओरल रीहाइड्रेशन सोल्यूशन) पाजा

  • फळांचे रस प्यावे

  • पुरेशी विश्रांती घ्यावी

  • थकवा आणि अशक्तपणा आणणाऱ्या शारीरिक क्रिया टाळा

  • कीटकनाशकाची फवारणी केलेल्या मच्छरदाण्यांचा वापर करा

तुम्हाला जर डेंग्यूची लक्षणे आढळून आली असतील तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरगुती उपाय करून आजार वाढण्याची भीती असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या