Sunday, April 27, 2025
Homeनगरपेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांना मारहाण

पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांना मारहाण

तिघे जखमी || नवनागापुरातील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नवनागापूर येथील भारत पेट्रोल पंपावरील तिघा कर्मचार्‍यांना चौघांनी मारहाण करून जखमी केले. गणेश वाळके, अबिद शेख, विश्वास बोराडे (पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी पंपाचे मॅनेजर चेतन विजयकुमार गुगळे (वय 40 रा. रामचंद्रखुंट, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शनिवारी (दि. 18) रात्री पावणे आठ वाजता नवनागापूर येथील पेट्रोल पंपावर सुरूवातीला अनोळखी दोघे जण आले. त्यांनी पंपावरील कर्मचारी अबिद शेख याला पेट्रोल टाकताना शिवीगाळ केले. शिवीगाळ करू नका असे म्हणताच त्या दोघांनी पंपावरील कर्मचार्‍यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. काही वेळाने ते दोन अनोळखी व्यक्ती व त्यांच्यासोबत आणखी दोघे पंपावर आले. त्यांनी पंपावरील कर्मचारी गणेश वाळके, अबिद शेख, विश्वास बोराडे यांना शिवीगाळ, दमदाटी करून पुन्हा लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पंपावरील मॅनेजर गुगळे यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार चव्हाण अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या