Thursday, May 2, 2024
Homeजळगावकारण की...आयुष्याशी अजून माझा करार बाकी

कारण की…आयुष्याशी अजून माझा करार बाकी

जळगाव jalgaon

स्वरचीत ‘आयुष्याशी अजून माझा करार बाकी’ या मराठी गझले पासून तर सुरेश भट यांच्या ‘गे माय भू तूझे मी फेडीन पांग सारे’ पर्यंत देशक्तीपासून तर अहिराणी गीतांपर्यंत अशा विविध भावरसांतील प्राध्यापकांच्या (professors) काव्य वाचन (Poetry reading) आणि गायनातून (singing) नूतन मराठा महाविद्यालयात (Nutan Maratha College) मराठी (Marathi) भाषा (language) संवर्धन पंधरवड्याचा (Conservation fortnight) समारोप करण्यात आला.

- Advertisement -

गेल्या पंधरा दिवसांपासून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने निबंध स्पर्धा, भित्तीपत्रकाचे अनावरण, वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यात आमंत्रीत मान्यवरारंसह प्रा. व. पु. होले यांचे वाचन संस्कृती या विषयावरील व्याख्यानाने पंधरवड्यास प्रारंभ झाला. धुळ्याच्या झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. योगिता पाटील यांचं भावस्पर्शी कथाकथन, स्थानिक प्राध्यापकांचे वेगवेगळ्या साहित्यिक कलाकृतींवरील अभिवाचन, पाच मान्यवर साहित्यिकांचा सत्कार, कविसंमेलन अशा विविध साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेलसह सुरू असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप इंग्रजी विभागाच्या प्रा. डॉ. इंदिरा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बहूभाषिक गीत काव्य सम्मेलनाने करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ग. दी. माडगूळकर यांच्या ‘हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सुर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे’ या गीताने डॉ. सुषमा तायडे यांनी करुन दिली. त्यांनी सुरेश भटांची ‘गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे’ हे गीत देखील सादर केले.

प्रा. रत्नाकर कोळी यांनी सामाजिक संदेश देणारे स्वरचित अहिराणी गीते सादर केलीत. प्रा. वंदना पाटील यांनी ‘आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे’ ही मराठी गजल आणि एक बाप विषयावरील स्वरचीत कविता सादर केली. प्रा. पौर्णिमा देशमुख यांनी विवेकानंद आणि सावरकरांच्या जीवनावरील ललित गद्य सादर केले. प्रा. कांचन धांडे यांनी बलसागर भारत होवो हे गीत सादर केले, प्रा. गजाला शेख यांनी सारे जहाँ से अच्छा हे गीत सादर केले. प्रा. मनिषा पारधी यांनी तु बुद्धी दे तु तेज दे हे गीत सादर केले, पोलिस कॉन्स्टेबल विनोद अहिरे यांनी आपल्या वेदनेचा हुंकार या काव्य संग्रहातील खाकी ही स्वरचीत कविता सादर केली.

समारोपीय मनोगतात प्रा. ललिता हिंगोणेकर यांनी पंधरा दिवसात झालेल्या कार्यक्रमाचा गोषवारा सादर करत सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार व्यक्त करत आईचं हृदय अन बापाचा कणा ही कविता सादर केली.

इंग्रजीला डोक्यावर घेवू नका : भाषा हे संस्कृतीचे उगमस्थान असते तीचे संवर्धन आणि जतन करून येणार्‍या पीढीला सुपुर्द केले पाहिजे, इंग्रजी भाषेत शिका जरुर पण तीला डोक्यावर घेऊ नका, मराठी भाषा वाचवायची असेल तर, मराठीतून बोलावं लिहावं आणि वाचावं लागेल. असा संदेश दिला.

प्रा. डॉ. इंदिरा पाटील, इंग्रजी विभाग

सुत्रसंचलन डॉ. सुषमा तायडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. रत्नाकर कोळी यांनी केले.

पंधरवडा यशस्वीतेसाठी मराठी विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर, डॉ. सुषमा तायडे, प्रा. राकेश गोरासे, प्रा. रिना पवार आणि प्रा. रत्नाकर कोळी यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या