Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमCrime News : रस्त्यावर गोमांस फेकणारा युवक अटकेत

Crime News : रस्त्यावर गोमांस फेकणारा युवक अटकेत

एक दिवसांची पोलीस कोठडी || स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर- पुणे महामार्गावर कोठला भागात रस्त्यावरच गोमांस आढळून आल्याने आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (16 सप्टेंबर) सायंकाळी रस्तारोको आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, यासंदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सहा तासांत एका संशयित आरोपीला ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तरबेज आबीद कुरेशी (वय 24 रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) असे अटकेतील संशयिताचे नाव असून न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

- Advertisement -

मंगळवारी सायंकाळी कोठला भागात रस्त्यावर गोमांस आढळून आल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आ. जगताप व आ. विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन केले. कत्तलखान्यासह गोमांस फेकणार्‍यावर कारवाईची मागणी लावून धरली. पोलीस व मनपाकडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, यासंदर्भात पोलीस अंमलदार अजय गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करून शोधमोहीम राबवली.

YouTube video player

मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा पोलिसांनी शोध घेतला. त्यावेळी तरबेज कुरेशी याचे नाव समोर आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने दोन बैलांची राहत्या घरी कत्तल करून त्याचे मांस विक्री केल्याची कबुली दिली. तसेच, कत्तलीनंतर उरलेले अवशेष टाकण्यासाठी त्याने दोन अल्पवयीन मुलांची मदत घेतल्याचेही उघड झाले. या मुलांना त्याने पैसे देऊन दुचाकीवरून अवशेष कोठला बसस्थानकाजवळ टाकून द्यायला लावले होते. ही कामगिरी पोलीस अंमलदार दीपक घाटकर, सुनील पवार, गणेश धोत्रे, शाहीद शेख, फुरखान शेख, भिमराज खर्से, सतीश भवर, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, भाग्यश्री भिटे, छाया माळी यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...