Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याकंटेनरसह लाखो रुपयांची बिअर चोरी

कंटेनरसह लाखो रुपयांची बिअर चोरी

घोटी । वार्ताहर Ghoti

औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथून किंगफिशर कंपनीचे 2,200 बिअरचे बॉक्स मुंबई कडे घेऊन जाणार्‍या कंटेनरचालकाला (एमएच 43 बीजी 5463) बेशुद्ध करून कंटेनरसह 43 लाखांचे बिअर बॉक्स चोरी करण्याची वैजापूर ते घोटी दरम्यान घडली.

- Advertisement -

कंटेनर चालक मोहमद साजिद अबुलजैस शेख (वय 22 वर्ष, राहणार आजमगड, उत्तर प्रदेश) याने दिलेल्या फीर्यादी नुसार या चोरीप्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 43,29,856 रुपयांचे बिअरचे 2,200 बॉक्स आणि 20 लाखांचा कंटेनर असा 63,29,856 रुपयांचा माल चोरी केल्याची तक्रार कंटेनरचालकाने केली आहे.

पोलिसांनी 6 संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, पोलीस उप अधिक्षक अर्जुन भोसले यांनी भेट दिली. सहा.पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी तपास सुरु केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या