Friday, May 3, 2024
Homeनगरभागानगरे खून प्रकरण; नऊ संशयित आरोपींचा समावेश

भागानगरे खून प्रकरण; नऊ संशयित आरोपींचा समावेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अवैध धंद्याची पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून ओंकार उर्फ गामा पांडुरंग भागानगरे (वय 24 रा. पांचपीर चावडी, माळीवाडा) या युवकाचा खून केल्याप्रकरणी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी आर.डी.चव्हाण यांच्या न्यायालयात एकूण नऊ संशयित आरोपी विरोधात सुमारे 250 पानी दोषारोपपत्र मंगळवारी (दि. 12) दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी ते दाखल केले आहे.

- Advertisement -

19 जूनच्या रात्री ओंकार भागानगरे यांच्यासह शुभम पडोळे यांच्यावर बालिकाश्रम रस्त्यावरील जाधव मळा परिसरात तलवारीने वार केले होते. यामध्ये ओंकार भागानगरे यांचा मृत्यू झाला होता तर पडोळे जखमी झाले होते. याप्रकरणी सात जणांना स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. तर दोघे जण अद्यापही पसार आहेत. एकुण नऊ संशयित आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आल्याने त्यांच्या विरोधातील पुरावे गोळा करून तीन महिन्याच्या आत तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक साळवे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

यामध्ये गणेश केरूप्पा हुच्चे, नंदू बोराटे, संदीप गुडा, सागर गुडा, रवी नामदे, वैभव हुच्चे, अनिकेत साळुंके, ओम हुच्चे आणि बबलू सरोदे यांचा समावेश आहे. यातील ओम हुच्चे व बबलू सरोदे हे दोघे पसार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या