Friday, May 3, 2024
Homeनगरभगवानगड, 43 गावे पाणी योजनेसाठी सहकार्य करा

भगवानगड, 43 गावे पाणी योजनेसाठी सहकार्य करा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

भगवानगड व 43 गावच्या पाणी पुरवठा योजनेचे कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या कायदेशीरबाबींची पुर्तता सुरु आहे. टेंडर झाले आहे. मान्यता दिलेली आहे. ही योजना पुर्णत्वाला येवुन जनतेला पिण्याचे पाणी तातडीने मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहे.अधिकारी व संबधीत गावच्या सरपंच व ग्रामसेवकांनी यांनी योजनेच्या कामासाठी मदत करावी असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

- Advertisement -

पाथर्डी पंचायत समितीच्या लोकनेते स्व.गोपिनाथ मुंडे सभागृहात आयोजीत आढावा बैठकीत आ.राजळे बोलत होत्या. रोजगार हमी योजना, लम्पी आजार व भगवानगड व 43 गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी भगवानगड व 43 गावाच्या सयुंक्त पाणी पुरवठा शिखर समितीच्या अध्यक्षपदी येळीचे सरपंच संजय बडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

यावेळी गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे, माजी सभापती सुनिता दौंड, माणिकराव खेडकर, सुनिल ओव्हळ, विष्णुपंत अकोलकर, एकनाथ आटकर, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, जिवन प्राधिकरणाचे उपअभियंता ऋणाल दगदगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कौशलरामनिरंजन वाघ, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी महेंद्र दराडे, सां.बा.चे उपविभागीय अधिकारी वसंत बडे, शाखा अभियंता आर.एस.आबेंटकर, शरद दहीफळे, अनिल सानप, येळीचे सरपंच संजय बडे, शुभम गाडे, सरपंच प्रदीप अंदुरे, नवनाथ धायतडक, सुरेखा राजेंद्र ढाकणे, नितीन गर्जे, तुकाराम देवढे, संदीप पालवे, महादेव जायभाये, नितीन किर्तने, विष्णु देशमुख, संदीप पठाडे, चारुदत्त वाघ, माणिक बटुळे, कविता गोल्हार, विश्वनाथ थोरे, संजय देशमुख, संजय दौंड, जालींदर भाबड, जमीर आतार, बाळासाहेब खेडकर, डॉ.शिवाजी किसवे, किशोर दराडे, अरुण मिसाळ, सुरेश बडे, नारायण पालवे व ग्रामसेवक उपस्थीत होते.

यावेळी झालेल्या बैठकीत तालुक्यात रोजगार हमी योजनेतुन वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात व्हावी.ज्या गावात यापुर्वी गायगोठे दिलेले नाहीत त्याच गावात प्राधान्याने रोजगार हमीचे गायगोठे द्यावेत. तालुक्यातील आराखडाबाह्य रस्ते आराखड्यात समाविष्ठ करावेत. लम्पी आजाराबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. अशा महत्वाच्या सुचना आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनाला दिल्या. गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे यांनी प्रस्ताविकात पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा दिला. सुभाष केकाण यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले.

43 गावांत पाणी पोहचल्यावरच सत्कार घेणार

आ. राजळे यांनी केलेला हा सत्कार मी आनंदाने स्विकारतो.मात्र यापुढे योजनेचे पाणी थेट 43 गावात पोहचेपर्यंत मी कोणताही सत्कार स्विकारणार नाही.योजनेच्या पाण्याचा जलाभिषेक संत भगवानबाबांच्या समाधिला करुन नंतर योजनेच्या पाण्याने अंघोळ केल्यानंतरच सत्कार घेईल असे समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय बडे यांनी यावेळी जाहीर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या