Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजBhai Jagptap: 'निवडणूक आयोग कुत्रा बनून'…; भाई जगतापांची जीभ घसरली

Bhai Jagptap: ‘निवडणूक आयोग कुत्रा बनून’…; भाई जगतापांची जीभ घसरली

मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय तर महाविकास आघाडीची दारुण पराभव झालाय. लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीला हा पराभव पचनी पडत नसल्याचे दिसत आहे. अशात विरोधकांकडून सातत्याने एमव्हीएवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. याच प्रकरणात निवडणूक आयोगावर (Election Commission) टीका करताना काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांची जीभ घसरलीये.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार भाई जगताप यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय, असे विधान भाई जगताप यांनी केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले भाई जगताप
निवडणूक आयोगावर टीका करताना जगताप म्हणाले की, ‘ इतकी मोठी आपली लोकशाही आहे, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे जर लोकशाहीवर काही प्रश्न उपस्थित केले जात असतील, काही शंका असतील तर त्याचे उत्तर हे निवडणूक आयोगाला आणि सरकारला द्यावेच लागेल. निवडणूक आयोग कुत्रा आहे. जेवढ्या काही संस्था आहेत या सर्व संस्था कुत्रा होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेर बसल्या आहेत. ज्या संस्था आपल्या लोकशाहीला मजबूत बनवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत, त्याचे असा व्यवहार करत आहेत.’ या शब्दात भाई जगताप यांनी वादाला आमंत्रण दिलेय. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलेय. भाजप आणि शिवसेनेसह सत्ताधारी नेत्यांनी जगताप यांच्या वक्तव्याचा कडाडून निषेध करत माफी मागण्याची मागणी केलीये.

दरम्यान, भाई जगताप यांनी केलेल्या या वक्तव्यावर टीका करण्यात येत आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही या विधानावरून भाई जगताप यांच्यावर निषाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वाचाळवीरांसारखे बोलणे सुरू आहे. त्यामुळे तेच भुंकताना दिसताहेत. भुंकण्यासारखी त्यांची वक्तव्ये आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना त्यादृष्टीने तसेच दिसणार.

माफी मागण्यास नकार
शिवसेना (शिंदे गट), भाजपासह संपूर्ण विरोधी पक्षांनी जगताप यांच्या वक्तव्याचा कडाडून निषेध करत माफी मागण्याची मागणी केली आहे. मात्र काँग्रेस नेते भाई जगताप हे मात्र त्यांच्या वक्तव्य़ावर ठाम असून माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगत त्यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दर्शवला.

निवडणूक आयोगासंबंधी केलेलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस नेते भाई जगताप म्हणाले की, मी अजिबात माफी मागणार नाही, अगदी एकदाही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांच्या दबावाखाली आयोग काम करत असेल, तर मी जे बोललो ते बरोबर आहे. मी माफी मागणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. निवडणूक आयोग देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी असतो, कोणाचीही सेवा करण्यासाठी नाही. मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. टी.एन. शेषन यांनी केलं तसं काम निवडणूक आयोगाने काम केले पाहिजे, असे भाई जगताप म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...