Friday, September 20, 2024
Homeनगरभंडारदरा-मुळा पाणलोटात पावसाचे तांडव

भंडारदरा-मुळा पाणलोटात पावसाचे तांडव

प्रवरा-मुळा नदीला पूर || अनेक गावांचा संपर्कही तुटला

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

अकोले (Akole) तालुक्यातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) पाणलोटात आणि मुळा नदीचा उगम असलेल्या हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचे अक्षरशः तांडव सुरू आहे. यामुळे मुळा (Mula River) व प्रवरा (Pravara River) या दोन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर (Flood) आला असल्याने नदीकाठच्या शेतांमध्येही पाणी घुसले आहे. तर मांडवे बुद्रुक ते मांडवे खुर्द या दोन्ही गावांच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संगमनेर (Sangamner) व पारनेर (Parner) या दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.

भंडारदरा आणि मुळा धरण पाणलोटात अक्षरशः कोसळधारा सुरू आहे. त्यामुळे भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे निळवंडे धरणातील (Nilwande Dam) पाणी पातळी वाढल्याने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. परिणामी प्रवरा नदीकाठी असलेले धांदरफळ बुद्रुक ते धांदरफळ खुर्द या दोन्ही गावांना जोडणार्‍या पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून युवकांना व विशेष करून लहान मुलांना नदीचे पाणी पाहण्यासाठी जाऊ नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

याचबरोबर घारगावमधून वाहणारी मुळा नदी (Mula River) देखील दुथडी भरुन वाहू लागली आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. याचबरोबर घारगावच्या स्मशानभूमीतही पाणी आले आहे. तसेच संगमनेर (Sangamner) व पारनेर (Parner) या दोन्ही गावांना जोडणार्‍या मांडवे बुद्रुक ते मांडवे खुर्द येथील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटल्याने असंख्य नागरिकांचे हाल झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे आणि पुलावरुन पाणी वाहत असल्याने कोणीही पूल ओलांडू नये, असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या