Thursday, May 7, 2026
Homeक्राईमCrime News : दोन महिलांना देवळाली प्रवरेत मारहाण; गुन्हा दाखल

Crime News : दोन महिलांना देवळाली प्रवरेत मारहाण; गुन्हा दाखल

राहुरी |वार्ताहर| Rahuri

मावशीला त्रास देवु नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी तरुणीला शिवीगाळ करुन गाडीचा पान्हा, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली. आकांक्षा लक्ष्मण लाढांगे (वय 24) रा. रेल्वे स्टेशन, रेल्वे कॉलनी, अहिल्यानगर, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, देवळाली प्रवरा येथील आरोपी योगेश मोरे हा आकांक्षा लाढांगे यांच्या मावशीला त्रास देत होता. दि. 29 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास आकांक्षा लाढांगे व त्यांची मावस बहिण राखी बनसोडे अशा दोघीजणी योगेश मोरे याच्या घरी देवळाली प्रवरा येथे गेल्या.

- Advertisement -

त्यावेळी तेथे योगेश मोरे व त्याचे आई-वडील होते. त्यावेळी आकांक्षा लाढांगे ह्या योगेश मोरे यास म्हणाल्या की, तू आमच्या मावशीला त्रास देवु नको. याचा त्याला राग आलेने त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. आणि म्हणाला की, तुझ्या मावशीकडे नव्वद हजार रुपये आहेत, ते मला दे मी त्रास देणार नाही. त्यावेळी आकांक्षा लाढांगे त्याला म्हणाल्या, तू पैसे दिल्याचा पुरावा दाखव. त्याचा राग आल्याने आरोपींनी आकांक्षा लाढांगे व राखी बनसोडे यांना शिवीगाळ करुन गाडीचा पान्हा, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही जर आमचे घरी पुन्हा आलात तर, तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

याप्रकरणी आकांक्षा लक्ष्मण लाढांगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश मोरे, शिवदास मोरे, योगेश मोरे याची आई सर्व रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, या तिघांवर भारतीय न्याय संहिता कलम 115 (2), 118 (1), 351 (2), 352, 3 (5) प्रमाणे शिवीगाळ मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

ताज्या बातम्या

Crime News : टरबूज परत केल्याच्या रागातून सावेडीत राडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar प्रेमदान चौकातील स्मार्ट बाजाराजवळ खरेदी केलेले टरबूज परत केल्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना सोमवारी (4 मे) सायंकाळी घडली. विकत घेतलेले टरबूज...