Friday, November 22, 2024
Homeनगरभंडारदरा, मुळा पाणलोटात रिपरिप; घोटी, इगतपुरीला मध्यम पाऊस

भंडारदरा, मुळा पाणलोटात रिपरिप; घोटी, इगतपुरीला मध्यम पाऊस

भंडारदरा, कोतूळ । वार्ताहर

भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात दोन दिवस आषाढ सरींनी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काल शुक्रवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. त्यामुळे दोन्ही धरणांमध्ये नवीन पाण्याची वाढीव आवक सुरू झाली आहे. पावसाळी वातावरण टिकून असून जनजीवन पुन्हा गारठू लागले आहे. या पावसामुळे भात आवणीचे काम थंडावले होते. ते पुन्हा सुरू झाले आहे.

- Advertisement -

पावसाची रिपरिप सुरू असल्याने धरणात गत २४ तासांत १६० दलघफू पाणी आले. ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी ३७३३ दलघफू (३३.४२टके) झाला होता. काल दिवसभर पडलेल्या पावसाची भंडारदरातील नोंद ८ मिमी झाली. गत दोन दिवस प्रत्येकी केवळ १ मिमी पावसाची नोंद होती. भंडारदरा परिसरात पाऊस सुरू असल्याने निळवंडे धरणात नवीन पाणी येत आहे.

धरणातील काल सकाळी १२०७ दलघफू पाणी साठा झाला होता. गत २४ तासांत पडलेला पाऊस असा (मिमी) भंडारदरा १, घाटबर ३६, पांजरे २३, रतनवाडी ३६. काल भंडारदा परिसरात पडलेल्या पावसाची नोंद ८ मिमी झाली आहे. मुळा पाणलोटातही रिपरिप सुरू झाली आहे. काल सकाळी कोतूळ येथी मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग ८८६ क्यूसेक होता. तो संध्याकाळी ७०४ क्युसेकबर आला. मुळा धरणातील पाणीसाठा ७७१७ दलघफू (३० टक्के) झाला होता. आढळा धरणात १० दलघफू पाण्याची आवक झाली असून ४७३ दलघफू साठा झाला आहे.

हे देखील वाचा :  उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

दारणा ३५ टक्के, भावली ४४ टक्के

राहाता (तालुका प्रतिनिधी)

घोटी, इगतपुरी परिसरात पावसाचे मध्यम स्वरुपाचे आगमन होत आहे. त्यामुळे दारणा धरणात पाण्याची आवक सुरु आहे. काल दारणात ४४ दलघफू नवीन पाणी दाखल झाले. दारणा काल सकाळी ३४.३४ टक्क्यांवर पोहचले. भावली ४३.३८ टक्क्यांवर तर गंगापूर २८.०३ टक्क्यांवर पोहचले आहे.

दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी येथे ४४ मिमी, घोटी ला १७ मिमी पावसाची नोंद झाली. काल दिवसभर पावसाचे मध्यम स्वरुपाचे आगमन होत होते. आता पर्यंत या हंगामात दारणात २२०० दलघफू म्हणजेच जवळपास सव्वादोन टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले आहे. सध्या ७१४९ दलघफू च्या दारणात २४५५ दलघफू पाणीसाठा आहे. कालच्या तारखेला मागील वर्षी हा साठा ३७४२ दलघफू इतका होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

दारणाच्यावर असलेला भावली प्रकल्प ४३.३८ टक्क्यांवर पोहचला आहे. या हंगामाच्या सुरुवातील या प्रकल्पात शुन्य टक्के उपयुक्तसाठा होता. आता त्यात ६२२ दलघफू नव्याने पाणी दाखल झाले आहे. हा प्रकल्प १४३४ दलघफू क्षमतेचा आहे. मुकणे धरण १.४२ टके, बाकी ४.४१ टक्के पाणी साठा आहे. चालदेवीत १४.३० टक्के पाणीसाठा आहे. काल सकाळी भावलीला १५ मिमी तर भाम ला ४८ मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरण २८.०३ टक्के भरले आहे. या हंगामात बा धरणात १० टक्के पाणीसाठ्धात काल पर्यंत बाद झाली आहे.

काल सकाळी ६ वाजता मागील २४ तासात ३३ दलघफू नवीन पाणी दाखल झाले. ५६३० क्षमतेच्या या धरणात १५७८ दलघफू पाणीसाठा आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला या धरणात १९९० दलघफू साठा तयार झाला होता, गंगापूर समुहातील कश्यपी ५.७२ टक, गौतमी गोदावरी १७.६१ टके, कडवा २७.४३ टाके, आळंदी २.२१ टके असा पाणी साठा आहे. काल सकाळी मागील २४ तासात गंगापूरला अवधा १ मिमी पाउस नोंदला गेला, धरण परिसरात पावसाने मनावर घेतलेले नाही. धरणाचे क्षेत्र मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या