Monday, January 26, 2026
HomeनगरBhandardara : दोन दिवसांत भंडारदरा ओव्हरफ्लो होणार

Bhandardara : दोन दिवसांत भंडारदरा ओव्हरफ्लो होणार

95 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा || मुळा पाणलोटातही पाऊस

भंडारदरा, कोतुळ |वार्ताहर| Bhandardara

अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात काल मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी भंडारदरा धरण येत्या दोन-दिवसांत ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वाढली आहे. मुळा धरणातही नवीन पाण्याची आवक होत आहे.

- Advertisement -

गत दोन दिवसांपासून पाणलोटात मान्सून सक्रिय झाला आहे. डोंगरदर्‍या धुक्याने लेपाटून गेल्या असून धबधबे जोमाने वाहत असून छोट्या नद्या, नाले खळखळून धरणात विसावत आहेत. घाटघर आणि रतनवाडीत पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत घाटघर येथे 54, रतनवाडीत 51 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

YouTube video player

काल मंगळवारी सरी आणखी जोरदार बरसत असल्याने काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरात 158 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले होते. त्यानंतर काल दिवसभरात 163 दलघफू पाणी आले. त्यामुळे सायंकाळी 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात पाणीसाठा 10349 दलघफू (93.75) टक्के झाला होता. रात्री 10 वाजता हा पाणीसाठा 10520 दलघफू (95.23 टक्क्यांवर )पोहचला होता. पावसाचा जोर असाच राहिल्यास येत्या दोन दिवसांत हे धरण ओव्हरफ्लो होणार आहे. निळवंडेतील पाणीसाठा 7125 दलघफू (85.55 टक्के) होता. या धरणातून 413 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. वाकी तलाव पूर्ण भरलेला असून त्यातून 98 क्युसकेने ओव्हरफ्लो सुरू आहे.

मुळा पाणलोटात सोमवारी दुपारपासून पावसाचा काहिसा जोर वाढल्याने कोतूळ येथील मुळा नदीचा प्रवाह 977 क्युसेक होता. 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणात 22596 दलघफू पाणीसाठा झाला होता. काल मंगळवारी हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात सरी जोरदार बरसत असल्याने मुळा नदीचा कोतुळ येथील विसर्ग सकाळी 1061 क्युसेक होता. तर 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा 22596 दलघफू झाला होता. सायंकाळी मुळा नदीतील विसर्ग वाढून तो 1753 क्युसेकवर पोहचला होता. तर साठा 22645 दलघफू झाला होता. पावसाचा जोर वाढल्यास हा साठा आज रात्री उशीरापर्यंत 23000 कलघफूच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

डिंभेतून घोड नदीत 12030 क्युसेकने विसर्ग
दक्षिण नगर जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या कुकडी पाणलोटात पावसाचा जोर वाढला असून या प्रकल्पातील सर्वात मोठ्या डिंभे धरणातून काल सायंकाळी एकूण 12030 क्युसेकने घोड नदीत पाणी सोडण्यात येत असल्याने पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गत दोन दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांच्या पुढे गेला असल्याने तो नियंत्रित करण्यासाठी दुपारी 9520 क्युसकने पाणी सोडण्यात येत होते. पण पाण्याची आवक वाढत असल्याने सायंकाळी हा विसर्ग 12030 क्युसेक पर्यंत वाढविण्यात आला. 11480 क्युसेक पाणी घोड नदी पात्रात सोडण्यात येत होते. वीज घरामार्फत आणखी 450 क्युसेक पाणी घोड नदीत सोडण्यात आले. तसेच डिंभे उजव्या कालव्यातून 100 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे या धरणांमध्येही पाण्याची आवक होत आहे. या समूहातील पाणीसाठा 73 टक्क्यांच्या वर गेला आहे. घोड धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने या धरणातूनही विसर्ग सोडण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...